गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

खेळलीस तू कशाला ................!!!

खेळलीस  तू कशाला ................!!!


पहायचेच होते नुसते तुला तर
हसलीस तू कशाला
मनांच्या भावनांशी माझ्या
खेळलीस  तू कशाला......................


घेऊ नकोस खोटी
आन ह्या प्रीतीची
पहिले प्रेमाचे घरटे
मोडलेस  तू कशाला ........................


केले तूच जखमी
नाजूक मन हे माझे
चोळून मीठ पहिले
लाळ घोळतेस तू कशाला .............................


होते प्रीतीचे पहिले
आता झाले विरह गाणे
विरहाच्या गीतास माझ्या
सूर लावतेस तू कशाला....................

मोहन कु-हाडे  ..................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा