प्रवास वर्णन


मला भावलेले अंबाजोगाई,.....................

                 सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले गाव म्हणजे अंबाजोगाई. या अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कवी, लेखक, विचारवंत, व सामाजिक कार्यकर्ते दिलेत. या मातीत खूप चांगले रत्न जन्माला आलेत. असेच म्हणां कि, मराठवाड्यातील एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक राजधानिच आहे अंबाजोगाई. अंबाजोगाई येथील धार्मिकते बद्दल जर सांगायचे  झाल्यास, साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले योगेश्वरी देवीचे मंदिर, याशिवाय मुकुंदराज यांची समाधी, तसेच दासोपंत असे अनेक धार्मिक मंदिरे आपणाला येथे पहावयास मिळतील. एक विशेष म्हणजे येथे अनेक जाती, धर्माचे लोक राहतात पण यां गावा मध्ये कधीही जातीय दंगल झालेली नाही. आणि अश्या माती बद्दल मला दोन शब्द लिहायला मिळाले, या बद्दल मी आभारी आहो. काही  चुकले तर............ अर्थातच लैच वेळा माफी..................मी यां निबंधां मध्ये काही अनुभवलेल्या कटू गोड आठ्वणी नमूद करतो ............खरे तर अंबाजोगाई संमेलना बद्दल आणि तेथे राहणा-या  लोकांबद्दल जेवढे लिहिले तेवढे कमीच आहे. तरी पण मी माझ्या नजरेतील काही क्षण येथे लिहित अहो. जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या, तर कुठलाही वाद न करता आताच माफी मागतो.
                           १८ तारखेला जवळपास आम्ही सकाळी सकाळी अम्बाजोगाईला पोहोचलो. मानवलोक मध्ये पोहचताच आमचे स्वागत केले, ते अभिजित शिंगारे दादा यांनी. हस्तांदोलन झाले ओळख झाली आणि अभिजीत दादा आपल्या पुढील कार्यासाठी रवाना झाले. त्यांनी सकाळी सकाळी सर्व लोकाना आपल्या गाडी मधून मानवलोकला आणले.  मानवलोक मध्ये दुसरी भेट झाली, ती आपले सर्वांचे लाडके दगडूदादा लोमटे यांची. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. आमच्या गाडीतील सर्व लोक त्यांच्या परिचयाचे होते. त्यांना मी जेव्हा माझी  ओळख करून दिली, तेव्हा ते म्हणाले, कि मी तुम्हाला ओळखतो. मनाला थोडे बरे वाटले. मग त्यांनी आम्हाला जिथे आमची राहण्याची सोय केली होती, तिथे वर घेवून गेले. आम्ही आपआपल्या रूम मध्ये ब्यागा ठेवल्या, व विचार केला कि रात्रभर जागेच होतो म्हणून थोडा आराम करावा. या विचारात असतानीच. वृषाली गोठ्खींडीकर म्याडम आल्या. आणि झोपच उडाली, आणि मग परिचयाचा सिलसिला सुरु झाला. एवढ्यात श्याळेतील  बरेच इध्यार्थी हजर झाले. मग लोमटेदादांनी चाहा वाल्याला बोलावले. तेव्हाचा तो क्षण अविस्मरणीयच होता. झाले, चाहा वाला आला, चाहा पीत असतानी एका चर्चेला उधान आले, ते म्हणजे फेस बुके चे. हा फेस बुके कोण आहे. आता मला या फेस बुके बद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून मला फार उत्सुकता लागली होती त्याना जाणून घेण्याची. सर्व लोक आपाआपल्या परीने फेस बुके बाबत बोलत होते.  एवढ्यात लोमटे दादा बोलले कि,  कुणाला बघायचे आहे  फेस बुकेला, चला लवकर फेस बुके आले आहेत आपल्या भेटीला. मला खरेच वाटले म्हणून मी वाकून बघितले, तर तो दाढीवाला डोक्यावर टोपी असलेला मळक्या मनिल्यात चाहा वाला होता. आणि  अश्या प्रकारे लोमटे दादांनी सर्वांनाच सकाळी सकाळी फ्रेश केले.....................
                                  खास म्हणजे मानवलोक आणि अनिकेत भैया ..............मानवलोक, हि एक सामाजीक संस्था आहे. आणि तिथे एम. एस. डब्लू. कॉलेज पण आहे. या संस्थेचा आपण आदर्श मानाला पाहिजे. याचे कारण असे कि, येथे १ % व्याजदराने शेतक-याना  कर्ज पुरवठा केल्या जातो, तसेच, येथे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविल्या जातात. जसे कि, शेतक-यांना बाजार भावा पेक्षा स्व:स्त दराने खत,बि,बियाणे उपलब्द करून देणे, आजारी रुग्णांना मोफत सुविधा पुरविणे तसेच शेती विषयक नवनवीन प्रयोग राबविणे, आणि ते प्रयोग शेतक-यान पर्यंत पोहचविणे. मला या मधील भावलेला एक असाच प्रयोग म्हणजे कृत्रिम पावूस. अनिकेत भैयांनी कृत्रिम पावसाची पूर्ण कृती आम्हाला समजावून सांगितली. मी मनात विचार करीत होतो कि, खरच माहाराष्ट्र ,मधील शेतक-यांनी जर स्व खर्चाने असे प्रयोग आपल्या शेतीत केले तर सरकार पुढे कुणालाही झुकायची गरजच नाही. अनिकेत भैया लैच वेळा सलाम आपणाला व मानवलोकला.................तुम्ही आणि मानवलोक दिवसागणिक अशीच प्रगती करो. आणि शेतकर्यान पर्यंत पोह्चो हीच हार्दिक शुभेच्छा ..........................................
                                 साधारणता आपण बघतो कि, केटरर्स वाले लोक आपल्या साठी जे जेवण बनवितात, ते जेवण ते लोक स्वता खाताना दिसत नाहीत. पण येथे असा प्रकार पहावयास मिळाला नाही. जे जेवण आम्ही जेवायचो तेच जेवण ते लोक पण जेवायचे.  चार हि वेळेचे जेवण एवढे अप्रतिम होते कि, आता सुद्धा त्या जेवणाची लज्जत गेली नाही. मला आणि इतर माण्यवराना भावलेले जेवण म्हणजे, रात्रीचे मेथीबेसन....... मेथीबेसन खातांनी आणि खावून झाल्यावर सुद्दा लोक म्हणायचे कि, वा ...............काय जेवण होते आजचे. खरे तर आपण बेसन बरेच दा खातो, मेथी पण बरेच दा खातो, पण मेथीबेसनचे कॉम्बिनेशन............हे फारच आगळे वेगळे होते, आणि मी तरी अंबाजोगाईला हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला. तशेच दही धपाटा वा खूपच छान. खास म्हणजे अजून आवडलेला एक पदार्थ म्हणजे "जवसाची चटणी" मला ती चटणी दिसताक्षणी मी त्या वाढप्या बाईला विचारलेच कि ...."अहो हि जवसाची चटणी आहे ना? ....."  ती बाई पण हो बोलली. तुम्हाला खरेच सांगतो मित्रानो ती चटणी खातानी मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली ती म्हणजे. आमच्या शेतातील जवस कापून आणल्यावर आम्ही भावंडे खळ्या मध्ये जायचो राखणीला. चटणी म्हणजे याम्म्म्ममी ........आणि दुसरे सांगायचे झाल्यास अन्नाची कुठल्याही प्राकारे नासधूस झालेली दिसली नाही. जेवण वाढणा-या  बायका पण एवढ्या टापटीप होत्या कि, असे वाटत नव्हते कि या जेवण वाढणा-या आहेत म्हणून . एकंदरीत सांगायचे झाल्यास, जेवण एकदम झ्क्कक्क्क्कक्क्कास ....................................
                         अम्बाजोगाईचे ग्राम दैवत म्हणजेच साडेतीन पीठांपैकी एक, योगेस्वरी देवीचे मंदिर. सुटी चा दिवस असल्या मुळे मंदिरात  भाविकांची खूप गर्दी होती. आता लोमटे दादांची लोकप्रियता म्हणा, कि त्यांचे समाजकार्य म्हणा, पण आम्हाला तेथील ट्रस्टीने  दर्शनाची सोय करून दिली. त्यांनी पहिले आम्हाला मंदिरा बद्दलची संपूर्ण माहिती दिली. आमच्या पैकी कुणीही स्वप्नात सुद्धा बघितले नसेल कि, योगेस्वरी मंदिरा मध्ये आपला असा सत्कार होइल. पण तेथील ट्रस्टीने चक्क आम्हाला एका हॉल मध्ये बसवून आमचे, नारळ व देवीचा फोटो देऊन सत्कार केला. म्हणजे आम्हाला देवीच पावली म्हणा ना..............
               अंबाजोगाईचे अजून एक खास वैशिष्ट म्हणजे येतील खुल्या जंगलातील मोर. आम्ही मोर बघण्याचे खूप प्रयत्न केले पण आम्हाला दिसलेच नाही. फक्त शिरीष पवार भाऊ यांनाच दिसले आणि त्यांनी आपल्या फोटो काढण्याच्या मशिनमध्ये कैद केले. हे मोर वाचले पाहिजेत म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते फारच मेहनत घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात टेकड्यांवर पाणी ठेऊन मोरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देतात. एवढेच नाही तर त्यांच्या खाण्याची सोय तर फारच वेगळ्या पद्धतीने करतात. धान्य बाजारात जाऊन तिथे पडलेले धान्य ते जमा करून आणतात व मोरांना खायला देतात. आपला राष्ट्रीय पक्षी वाचविण्याची हि खासच पद्धत आहे . अंबाजोगाईच्या सामाजिक कार्यकर्त्याना मनापासून सलाम.
                      अंबाजोगाईची खास जागा म्हणजे " टेबलल्यांड "  मी एका शेतक-याचा  मुलगा असल्या मुळे मला या जागेचे विशेष करून महत्व वाटले. कारण येथील तांड्या मध्ये राहणा-या  लोकांविषइ दोन शब्द लिहायला मिळालेत. जेव्हा या ठिकाणी गेलो, तेव्हा येथील लोकांचे खरे दु:ख कळले. हि जागा अशी आहे  कि, येथे उभे राहिले म्हणजे, आजूबाजुचा संपूर्ण परिसर आपणाला न्याहाळता येते. तिथे आम्हाला बघायला मिळाले ते म्हणजे अंबाजोगाईच्या शेतक-यांचे  दु:ख.  इथल्या तांड्याचा मजूर संपूर्ण माहारासष्ट्र  भर पोटा पाण्या साठी फिरत असतो. जेव्हा उस तोडणीचा हंगाम चालू होतो, तेव्हा तांड्यावर कुणीही राहत नाही, शिवाय फक्त म्हाता-या  माणसांशिवाय आणि लहान लहान श्याळेत जाणा-या  मुलांशिवाय. मित्रानो, अश्या वेळेला काय परिस्तिथी असेल या जागेची...................जर कूणी  घरात बिमार पडले तर कसे करीत असतील येथील लोक. असेच समजावे कि जिवंत असून मृत झालेले तांडे,  आणि जेव्हा बागायती शेतक-यां कडे  दुष्काळ पडतो, तेव्हा ह्या तांड्यातील परिस्थिती काय भयानक असेल ....................... लोमटे दादा जेव्हा हि परिस्थिती सांगत होते, तेव्हा मन खुप भरून आले होते. माझे डोळे तर भरूनच आले होते. मला शेतक-यांच्या  जीवनावर एक कविता सादर करावी वाटत होती, पण नाही करू शकलो, कारण तेव्हा मी पूर्ण पणे निशब्दच झालो होतो. आणी माझे पाणावलेले डोळे दिसायला नकोत, म्हणून मी त्याच तांड्यावरील एक वेडा मनुष्य आला होता, त्याचा कडे पाठमोरा करून उभा होतो.................पण माझे कान मात्र कांचनजी कोतवाल, वाकुडकर सर, याच्या कवितांकडे होते. उंच उंच टेकड्या, दुरून जरी हिरव्या दिसत होत्या, पण जवळ जावून बघितले तर पूर्ण पणे सुकलेल्या होत्या. सुकलेले झाडे, सुकलेल्या गवताशीवाय काहीच दिसत नव्हते. शेतातील पिक पूर्ण पणे सुकलेले होते. काही शेतात तर पूर्ण पिकच नेस्तनाबूत झालेले दिसत होते (मन खूप भरून आले कारण शेतकरी हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून आटोपते घेत आहो. लिहायचे तर खूप होते  )..............

मोहन कु-हाडे...........

नाशिक टावर वरून ................

(२५/८/२०१२ सायंकाळी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा