लेख

 बाबास पत्र...............!!!


ति . बाबास स. न. वि . वि .
पत्राचे प्रयोजन असे कि मी मजेत आहो . तुमी माई काईच  कायजी  करू नोका, मी इकडे खुशीत हाव . बाबा तुमी कसे हात ?.
            बाबा शाळेत माये चांगले दोस्त झालेत. होस्टेलात  पण चांगले दोस्त झालेत. पोट्टे लैच  हुशार हायेत. मले कोण्याच गोष्टीची कमी पळू देत नाईत . लायेच साथ देतात. माया दोस्त सिरीराम , मिलिंद , जयवंत , सांतोस , कैलास, मले लायेच जीव लावतात . आमी संगच अभ्यास करतो , खेवतो अन एकाच ठिकाणी होस्टेलात  झोपतो . मले पयले शाळेत लैच  भेव वाटायचा पण या माया दोस्ताय्मुळे आत मी चांगला रायतो .
              बाबा तुमी मले पैसे बिय्शे पाठवण्याच्या भांडगळीत  कायी पळू नोका.  नायतन  व्याजाने पैशे काढसान  सावकारा जवळून आन पाठवसान मले . बाबा माया शाळेची फी आन होस्टेलची फी माया गुर्जीनच भरली . माये गुर्जी लैच भला माणूस हाय . माया साठी त ते देवच हायेत . गुरुजी मले बोल्ले  कि " हनम्या तू लयेच हुशार हायेस म्हणून मी तुयाली फी भरतो पण एका अटीवर तुले माया घरच्या परीस बागेला रोज पाणी घालावे लागेल . आणि सोबत अभ्यास पण करावा लागेल . तुले तुया बाबाचे सपन पुरे  करायचे ना  ?. " बाबा मी रोज गुर्जीच्या बागेची देखभाल करतो . आवं  बाग एवढी चांगली फुलवली कि बाई पण मायावर लैच  खुस हायेत . रोज संध्याकायी त्यायच्या घरी गेल्यावर बाई  मले खायला देतात माया कडून अभ्यास करून घेतात . मले कुठल्याच गोष्टीचे अंतर देत नाईत .त्यायचे पोर पण आता माये चांगले दोस्त झालेत.
             आमच्या श्यालेचे हेडमास्तर पण मला खूप मदत करतात वेळोवेळी अभ्यासाबाबत बोलतात आणि म्हणतात " हनम्या तुया बापाचे प्त्राबित्र आले होते काय रे"  मी नाही बोललो कि लगेच खिश्यातून  पंधरा पैशे काढून देतात आणि म्हणतात कि " हनम्या आन पोस्टातून पत्र आन ली तुया बापाले . बाबा अतचे लोक लयेच चांगले हायेत हो .
     बर आपला विन्या शाळेत जातो कि नाही, त्याले सांगा कि, ज्यास्त वात्रट पण करू नकोस रोज शाळेत जायचे तू आठवीत गेल्यावर तुलेय अतीच  आणीन म्हणा शिक्याले  .
       बाबा माय  कशी हाये हो ते त  लायेच आठोन कळत  अशिन ,   तिले सांगा कि तुया पोरगा  खुशीत हाये म्हणा की काइ काय्जी  करू नकोस, जेवण बिवन करीत जय म्हणा,  नाय तन राय्शीन उपाशी पोराच्या काय्जीत, आव म्हणा तुयाला पोर लये शिकीन जिल्ह्याच साहेब होईन आन मग आपले बी दिवस  पालटतीन  आईची कायजी  घ्या .
 बाबा या वर्षीच्या आमच्या शाळेच्या कारेक्रमात माव भाषण हाये बाबा येसान  काय हो तुमी माव भाषण आयक्याले  . बाबा मजुरी पडून येऊ नका   तुमच्या जवळ वेळ अशीन  त या नाय तन नोक येऊ ...............
 बर ठीक हाय ......................

                                                                          तुमचा मुलगा
                                                                                हनम्या
======================================================================================

 =======================================================

 अद्भुत शक्ती ................!!!

मी मुंबईला असतानाची गोष्ठ आहे. जवळ जवळ १० वर्ष झाले असतील.
मी तेव्हा बांद्रा येथे रहायचो. तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती
म्हणून मी  पाणी  आनायला बाजूच्या गल्ली मध्ये जाऊन पाणी आणायचो.
असेच एक दिवस पाणी आणण्यासाठी गेलो वेळ दुपारची होती.
मी रस्त्यांनी जात होतो.
               तसे मुंबईचे रस्ते तर तुम्हाला माहीतच आहेत, नुसते गर्दीने भरलेले,
अश्यातच भर  म्हणून कि काय मी पण चालत होतो .
            तसा मी नास्तिकच, पण  त्या दिवशी जे माझ्याशी घडले ते मी कधीही विसरू शकत नाही.
 मी रस्त्याने  जात असता  माझ्या पाठी मागून शिटी बस येत होती,
पण माझे लक्ष त्या बस वर नव्हते,  मी माझा माझा विचार करीत रस्त्याने चालत होलतो.
पण अचानक माझ्या काना मध्ये एक आवाज आला कि,
अरे कुणीतरी बस मधून खाली पडत आहे लवकर उचल त्याला.
क्षणात मागे वळून बघितले तर काय, खरेच त्या बस मधून एक लहान मुलगा  पडलेला ............
मी मागचा पुढचा काहीही विचार केला न करता त्या मुलाला माझ्या दोन्ही हातामध्ये घेतले,
आणि बस मागे चालू लागलो. त्या मुलाचे  नशीब चांगले कि ,
त्याला कुठलीही इजा झाली नाही,  थोडे फार खरचटले होते फक्त. लगेच बस  थांबली,
आणि त्याची आई बस मधून खाली उतरली  तसे मी त्या मुलाला त्याच्या आई  कडे दिले .
           तुम्हाला सांगो तो मुलगा बस मधून खाली पडला ते त्या बाईला काही घेणे देणे नव्हते,
 ती फक्त म्हणायची कि माझ्या मैत्रिणीची पर्स कुणीतरी बस मध्ये चोरली. पण बस एवढ्यात  पुढे निघून गेली, त्या बाईची  मैत्रीण पण . मी त्या बाईला बोलत होतो, कि अहो पहिले त्या मुलाला काही लागले का ते बघा पर्स गेली तर जाऊ द्या मी तुम्हाला पैसे  देईल पण त्या बाईची कमाल .
             मी त्या बाईला विचारले कि, तुमच्या कडे पुढील प्रवासासाठी पैसे आहेत का?
तुम्ही कुठे राहता ? तुम्हाला बस मध्ये बसून देऊ का ?
 तुमच्या कडे जर तिकिटाचे पैसे नसतील तर मी देतो तुम्हाला,
ती बाई म्हणाली कि, आहेत माझ्याकडे पैसे . पण माझी मैत्रीण बस मध्ये निघून गेली
तिच्या कडे पैसे नाहीत. परत तिने मैत्रिणीचे रडगाणे चालू केले
             अहो मला त्या बाईचा तेव्हा खूप   राग आला होता. आणि खास म्हणजे त्या
बाईची एवढी मदत करून सुद्धा तिने साधे धन्यवाद सुद्दा म्हटले नाही .
पण एक गोष्ट त्या दिवसा पासून लक्ष्यात आली कि, या जगामध्ये एक
अशी काही अद्भुत शक्ती  आहे कि, ती आपल्याला सुद्दा विचार करायला लावते
(हि खरी घटना आहे )

मोहन कु-हाडे

==========================================================
मित्रानो जग हे फार सुंदर आहे रे.........!!!

जीवन जगत  असतांना  आपणाला खूप सा-या

चांगल्या किवा वाईट गोष्टीना  सामोरे जावे लागते.

आयुष्या मध्ये  ज्यादा  तर वाईट गोष्टींचाच  सामना करावा लागतो.

 म्हणून काय आपण जगणेच सोडून द्यायचे का ?

चार गोष्टी वाईट जरी भेटल्या तरी एक तरी चांगली भेटणार आहेच ना.

जगा ह्या असाह्य वेदना करणा-या जगा मध्ये. आणि   तोंड ध्या त्याना .

तुम्ही जर रस्त्याने चालत असाल आणि तुम्हाला

एखाद्या दगडाची ठेच लागली आणि त्यामधून

रक्त वाहत  असले म्हणून काय तुम्ही

अर्धा रस्ता सोडून माघारी येणार का ?  नाही ना  .

तर मग तो रस्त्यात पडलेला दगड उचलून

बाजूला फेकून देण्यातच तुमचा फायदा आहे .

कारण तुमच्या मागून त्या रस्त्याने येणारा

तुमचाच भाऊ किवा मित्र असेल .

मित्रानो जग हे फार सुंदर आहे रे.........!!!

पण आपणाला ते सौंदर्य बघण्यासाठी तसा

चष्मा घालावा लागेल तरच तुम्हाला हे जग सुंदर दिसेल .......!!!

मोहन कु-हाडे ....................

 ==============================================================

 काश..... माझे रेकोर्डिंग जर झाले असते त तर..........................!!!


मित्रांनो, प्रत्येकालाच  वाटते कि आपण जे काम करतो त्या कामाची पोहच पावती हि आपणाला योग्य ती मिलाय्लाच  पाहिजे.  पण ती कुणाला मिळते, तर कुणाला नाही. असाच घडलेला माझ्या बाबतीतला एक प्रसंग मी आपणाला आज सांगणार आहो.
          जवपास 1994 ते 1995 ची घटना असेल,  मला वाटायचे कि माझ्या कवित मी आकाशवाणी वर द्याव्या. आणि मी त्या तयारीला पण लागलो. मी माझ्या दहा  कविता सिलेक्ट केल्या. आणि अकोला आकाशवाणी येथे गेलो. तिथे नौकरी करणारा एक मनुष्य माझ्या गावचाच होता,  म्हणून मला काही अडचणी आल्या नाहीत. मी माझ्या दहा  कविता तेथिल  प्रमुखाला ल दिल्या,  आणि माझे नाव व गावाचा पूर्ण पत्ता देऊन मी घरी आलो. कारण ते लोक पहिले कविता चेक करणार होते, आणि  माझ्या घरी मला पत्र पाठवून  कळविणार होते कि, तुमच्यां अमुक अमुक कविता आम्ही सीलेक्ट  केल्या, आणि तुम्ही या या तारखेला कविता वाचन करण्या साठी अकोला आकाशवाणीवर हजर रहा.
     आठ पंधरा दिवसाने मला पत्र आले कि, आपल्या सात कविता आम्ही सीलेक्ट  केल्यां, आणि आपण या तारखेला कविता वाचना  साठी हजर रहावे. आता आकाशवाणीवर आपल्य कविता येणार म्हणून मी खूपच आनंदात होतो. मी मित्राना पण सांगत सुटलो कि आता माझ्या कविता अकोला आकाशवाणीवर येणार आहेत, ते पण खूप खुश झाले. आणि अश्याच आनंदात मी अकोला येथे गेलो 11 ते 11:30चा वेळा आसेल मी आकाशवाणी च्या ऑफिस मध्ये दाखल झालो. तिथे जो माझ्या गवचा  मनुष्य होता, मी त्याला भेटलो व त्याने माझी जो रेकोर्डिंग करणारा होता त्याच्याशी माझी ओळख करून दिली. रेकोर्डिंग करणाराने मला रेकोर्डिंग रूम मध्ये नेले, आणि माझ्या सिलेक्टेड  कविता मला दिल्या आणि काही सूचना देवून तो रुमच्या बाहेर कविता रेकोर्डिंग साठी. जावून बसला. मी  बापाच्या जन्मात कधी ए . सी. बघितली नव्हती ती तिथे बघितली आणी  अनुभवली पण. माझ्या चारही बाजूने काचा लावलेल्या. एक खुर्ची. एक टेबल. आणि त्या टेबलवर माईक. बस एवढेच होते त्या रूम मध्ये. माझा आवाज त्याला ऐकू येत नव्हता, ना त्याचा मला. काही काळासाठी मी तर निशब्दाच झालो. काय बोलावे काय नाही काही काही सूचन नव्हते. मग पाचेक मिनिटांनी त्याने स्पीकर चालू केला तेव्हा कुठे मला बरे वाटले. आणि आम्हाला एकमेकांचे संभाषण ऐकू यायला लागले. त्यांनी मला काही सुचना केल्या आणि कविता वाचण्यास सांगितले .
             झालं ....मी कविता वाचनाला सुरुवात केली ......मला चांगे आठवते कि मी पहिलीच कविता साने गुरुजींची म्हटली आणि ती तीन वेळेस मला म्हणावी लागली, तेव्हा कुठे ती रेकोरडींग झाली. मला ऑपरेटरने  इशारा केला कि, आता दुसरी कविता म्हणा, मी दुसरी कविता म्हणायला लागलो, तर त्याने मला मधेच थांबवले आणि एक सूचना केली कि, लगेच वाचन चालु करायचे नाही, एक कविता संपली कि, असे म्हणायचे कि, "माझ्या या नंतरच्या कवितेचे नाव आहे ............. मी हो बोललो आणि म्हणालो ."माझ्या या नंतरेच्या  कवितेचे नाव आहे " तो मला म्हणाला कि "यानंतरतेच्या असे नाही म्हनायचे. या नंतरच्या असे म्हणायचे "....... पण मला यानंतरचे काही केल्या येतच नव्हते. माझ्या तोंडातून यानंतरतेच्याच येत होते. शेवटी तो ऑपरेटर  चिडला.  आणि यातच मी घाबरून गेलो. आता तर मला कविता वाचन पण जमत नव्हते, माझ्या तोंडातून शब्दच बाहेर  पडत नव्हते, कसे तरी त्या माणसाने माझ्या कविता रेकोर्डिंग करून घेतल्या आणि, मला सांगिते कि ज्या दिवशी तुमच्या कविता आम्ही सदर करू त्या अगोदर तुम्हाला कळवू आणि मी निराश मनाने घरी निघून आलो .
    मित्रानो मलां आजही या  गोष्टीची खूप खंत वाटते कि, मला स्टेज डेअरिंग असून सुद्धा का हे जमले नाही. मी कविता पण उत्तम प्रकारे म्हणतो. मग का असे झाले असेल. मला जेव्हा कधी हि गोष्ट आठवते, तेव्हा मी फार निराश होतो. काश माझे रेकोर्डिंग जर झाले असते त तर..........................!!!
मोहन कु-हाडे..............

=========================================================================

फेसबुक ............
मला वाटते कि, साधारणता तीन ते चार वर्षा पासून आपणाला या गोष्टीची माहिती असेल. मित्र मैत्रिणी बनविणे, त्यांचे आचार विचार समजून घेणे, याच माध्यमातून जिवलग मैत्री सुद्धा आपण झालेली बघतो . प्रेम प्रकरण झालेले सुद्धा आपण बघतो,  पण  ते कितपत यशस्वी झालीत देव जाणे ......... असो .....
             मी आज माझ्या मनोगता मध्ये अश्याच एका मित्राची गोष्ट आपणाला सांगतो. आमची  मैत्री कशी झाली ते . साधारणता पंधरा सोळा वर्ष झाली असतील, मला शब्द कोडी सोडवायची खूपच आवड होती. मला जिथे शब्दकोडी  दिसेल तिथे मी ते सोडवत बसायचो. असेच अकोला येथे एक दिवस गेलो. दिवसभराचे काम आटोपून घरी यायला लागलो. मला वर्तमानपत्र घ्यायचे होते म्हणून बाजूच्याच बुकस्टोल वर गेलो. तिथे मला खूप सारे शब्द्कोड्यांचे  पेपर दिसले. मी त्यातील महा शब्द्कोड्यांचा पेपर घेतला आणि बस मध्ये जाऊन बसलो. बस मध्ये बरोबर लिहिता येत नव्हते, म्हणून मी कोडी न सोडविता पेपरच  वाचत होतो. त्यामध्ये विनोद होते, आणि खूप सारी जनरल माहिती होती. एक प्रकार होता "हायराणी "  हि पहिले "लोकमत " ला यायची मला आठवते कि मी तेव्हा तिला एक प्रश्न विचारला होता " शाळा सुटते तेव्हा मुलं मुली एक होतात, पावूस पडला म्हणजे नदीनाले एक होतात, तर आपण कधी एक होणार "........... तिने उत्तर दिले. "लवकरच "..........मला वाटते कि विषयांतर होत आहे असो ...................
                तर वाचता वाचता माझे लक्ष एका बातमीवर गेले, आणि ती बातमी होती " पेन फ्रेंड क्लब " ची म्हणजेच "पत्र मैत्री" ची . अशी पत्र मैत्री आपणाला करायला मिळाली कि नाही मला माहित नाही. पण आज आपण जशी फेसबुकवर मैत्री करतो त्याच प्रकारे हि पत्र मैत्री होती. मला या गोष्टीची फार उत्सुकता होती, कि, हे आहे तरी काय, म्हणून मी दुस-याच दिवशी ज्याने बातमी दिली, त्याच्या पत्यावर पत्र पाठविले. तिकडून उत्तर आले ."  आपले पेन फ्रेंड क्लब मध्ये स्वागत आहे, आता तू आमच्य क्लबचा मेंबर झाला आहेस. जर तुला काही अडचणी असतील, तर जरूर आम्हाला कळविणे. आणि मैत्री टिकवून ठेवणे"............मी त्याला प्रती उत्तर दिले ..........."मित्रा तुझे पत्र मिळाले, वाचून आनंद  झाला. मित्रा माझ्या तर काही अडचणी नाहीत. तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या जर काही अडचणी असतील तर मला जरूर कळविणे. शक्य असल्यास  मी सोडविण्याचे पूर्ण प्रयत्न करेल. झालं  आमचा पत्रांचा शिलशिला चालू झाला. माझे  काही प्रोब्लेम्स तो सॉल करु लागला, व त्याचे काही प्रोब्लेम्स मी सॉल करू लागलो. आता आमची मैत्री ब-या  पैकी फुलली होती. दर तिस-या  चौथ्या दिवशी आमचे पत्राचे वेव्हार चालू झाले. जर एखादा आठवडा त्याचे पत्र आले नाही, तर खूप बेचैनी वाटायची . एव्हाना  आम्ही खूपच जिवलग मित्र बनलो  होतो . एकमेकांची काळजी पण वाटू लागली.
                   असेच एक दिवस त्याच्या भेटी साठी मी पुण्याला गेलो. त्याचे घर माहित नव्हते, पण शोधत शोधत त्याच्या घरी गेलो. बाहेरून आवाज दिला. त्याची आई बाहेर आली " राजेश शेवाळेचे घर हेच आहे का? ".......ती बाई उत्तरली . " हो..... हेच, आहे आणि आपण कोण आहात "......... " मावशी मी मोहन कु-हाडे राजेशच्या भेटीसाठी आलोय"...............त्याची आई माझे नाव ऐकताच आचर्यचकीत  झाली  आणि म्हटली .  "अरे तू आणि एवढ्या लांबून आलास आपल्या मित्राला भेटायला "................... मी मनात विचार करीत होतो कि ह्या मावशी आपल्याला कश्या  काय ओळखतात. माझ्याकडून रहावलेच गेले नाही म्हणून मी त्याना विचारलेच .." मावशी तुम्ही मला कश्या काय ओळखताय".............. त्या बोलल्या ........" अरे राजेश नेहमीच तुझ्या विषयी सांगत असते मला. म्हणून मी तुला नावानिशी ओळखते ".............मावशी चहा ठेवतात इकडच्या  तिकडच्या गप्पा झाल्यावर मावशी चहा देतात. एवढ्यात राजेश पण घरी येतो. पण तो मला ओळखण नाही कारण, आमची पत्र मैत्री.......... कधी एकमेकाना बघितले नाही......... तर कसे काय ओळखणार एकमेकाना. मी त्याला माझी ओळख करून दिली. तेव्हा तो अच्म्ब्यातच पडला, त्याला विश्वासच येत नव्हता कि, एक पत्र मित्र आपल्याला एवढ्या लांबून भेटायला आलाय. मग काय, आता चक्क आपल्या आवडीचाच मित्र समोर बसलेला आहे म्हणजे गप्पांचा ओघ सुद्धा ज्यास्तच आला. आम्ही तेव्हा खूप गप्पा मारल्या त्याच्या आईने जेवण तयार केले. आम्ही दोघे जन जेवलो. आता वेळ होती ती माझी पुण्यावरून माझ्या गावी यायची. काही केल्या माझे पायच वळत नव्हते घरी वापीस येण्या साठी. आणि वळणार तरी कसे, मला वाटायचे कि आपण खूप गप्पा गोष्टी कराव्या. खूप फिरावे, खूप मौज मजा करावी, पण करणार काय, मला थांबणे श्यक्य नव्हते म्हणून मला  परतीच्या वाटेने जावेच लागले. परतीच्या वाटेवर लागताच डोळ्युआतून आनंदाश्रू अनाहूत पणे वाहू लागले. तेव्हा कळले कि मैत्री काय असते ते.
                         गावी आल्या नंतर  परत पत्र व्यवहार चालू झाला. पण काही दिवसातच कुठे माशी शिंकली हेच कळले नाही. कारन आजकाल तो मला टाळायला लागला मी पाठविलेल्या पत्राची उत्तरे दो देत नव्हता तरी पण मी नियमित पणे त्याला पत्र पाठवीत होतो. पण मला त्याचा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मला असे वाटायचे कि याचा पत्ता बदलला असेल म्हणून कदाचित त्याला आपले पत्र मिळत नसणार, आणि तो आपल्याला उत्तर नाही पाठवीत नसणार. म्हणून मी पण आता त्याला पत्र पाठविणे बंद केले. ते कायमचेच.
                  मित्रांनो काय चुकले माझे, काय कमी पडले असेल माझ्या मैत्री मध्ये................????
मित्रा राज,   कुठे आहेस तू, अरे मी आज सुद्धा तुझी वाट  बघतोय रे .......................अरे काय चुकले माझे ते तरी सांग राजा .................माझ्या कडून काही चूक झाली असेल, तर माफ कर रे मला ....................... अरे माझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडलेय यार. मी ते कुणालाही सांगू शकत नाही. तू जर जवळ असता, तर मी तुला सांगितले असते, तुला ऐकायचं ना ?.................. तर मग ये वापस तू ................ हे बघ मी तुला मैत्रीची भिक मागतोय  .................  पण तू माझ्या आयुष्यामध्ये परत ये ..............................

( मित्रानो, हि गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे. इथे मी जिंकण्याच्या उद्देश्याने मोनोगत व्यक्त करीत नाही. जर, माझा मित्र मला या उपक्रामाद्वारे मिळाला तर किती बरे होईल.  मी आपल्या रेणुका परिवारातील अद्मिन्चा ॠणी आहो, मला माझ्या मनातील हि भावना व्यक्त करायला मिळाली.जर आपणापैकी कुणी अश्या प्रकारे मैत्री केली असेल, आणि पुण्याचे "मित्र पेन फ्रेंड" क्लब मध्ये राहून गेलेले असतील तर मला जरूर कळविणे. हि नम्र विनंती "..............)

मोहन कु-हाडे....................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा