कविता

 मन खूप भरून आलय आज.................!!!



मन खूप भरून आलय आज.................!!!

आपलं  कुणितरी  असलं 

तर खांद्यावर डोकं  ठेऊन रडता तरी येत 

नेमकं  काय होतय  आज कळतच नाही 

उदास झालाय  आज जीवन 

लक्ख चांद्ण्यात  सुद्धा 

शिशीरातला काळोख दाटलय आज.............

मन एका जागेवर स्थिरावतच  नाही 

रंगीबेरंगी फुलपाखरासारखे  

ह्या फुलावरून त्या फुलावर धाव घेताय 

ह्या मनातील भावना कुणातरी जवळ 

मोकळ्या कराव्या  वाटतात 

पण जवळचे आहे तरी कोण...........

सेवटी  हाताची उशी करून 

हमसून हमसून रडतोय आता............

मन तर खूप हळवे आहे 

काय करावे कसे समजवावे 

कळताच नाही 

त्याला सुधा कळले असेल 

कि, 

ह्या जगात हक्काचे कुणीच नाही  .......................!!!


मोहन कु-हाडे ...........................!
===================================================

प्रेम म्हणजे प्रेम असत ......................!!!!

प्रेम म्हणजे प्रेम असत
पण ...............
तुमचे आमचे सेम नसते
तुमचे साता समुद्रा पार जाते
आमचे मात्र चिखलाच रुतून बसते
तुमचे प्रेम कट्ट्यावरून
घरात घुसते
आमचे मात्र त्याच कट्ट्यावर
रुतून बसते
तुमचे प्रेम पत्रावरून 
intaarnet वर झळकते
आमचे मात्र पोस्टाच्या
लाल डब्यातच अडकते
तुमचे प्रेम समुद्राच्या
लाटांवर सुद्धा स्थिर राहते
आमचे प्रेम मात्र
हवेच्या हलक्याशा  झुळकीने 
कोलमडून पडते
तुमचे प्रेम एका मुलीवर बसते
आमचं प्रेम मात्र
पूर्ण जगावर असते
म्हणून म्हणतो
प्रेम म्हणजे प्रेम असते
पण ...................
तुमचे आमचे सेम नसते .....................
मोहन कु-हाडे
 
===============================
हि मिठी रेशमाची ...................!!!


ना विझला अजुनी चंद्र
ना विझला अजुनी तारा
सखे येणा मिठीत माझ्या
छेडू मिलनाच्या तारा


न कळले कधी मला
कि , रात्र संपली केव्हा
चुंबिले तू भाळ माझे
मज जाग आली तेव्हा


कर मोकळी गळ्यातील
हि मिठी रेशमाची
चल उठ सखे आता
रात्र संपली चांदण्यांची

मोहन कु -हाडे...............
============================================


प्रेम .................!!!



हृदयाच्या कप्यातून निघालेले

ते माझे पवित्र प्रेम होत

झा-याच्या निर्मळ झुळझुळ

वाहणा-या पाण्यासारखे

ते माझे प्रेम होत

मायेच्या ओलाव्याने

काठोकाठ भरलेले

ते माझे प्रेम होत

शिशिरातल्या काल्याकुठ

रात्रीला


काजव्यांच्या उजेडाने लक्ख

होऊन चांदणे झिर्पावे


ते माझे प्रेम होत


वैशाखेच्या उन्हात साउली


होऊन सोबत चालणारे


ते माझे प्रेम होत

कृष्णाच्या सखीन्सारखे जरी

नसले तरी

ते एका नाजूक धाग्यात

बांधलेलं

ते माझे प्रेम होत  ......................


मोहन कु-हाडे   ...........................
======================================

मन खूप भरून आलय आज.......................


मन खूप भरून आलय आज
आपलं  कुणितरी  असलं 
तर खांद्यावर डोकं  ठेऊन रडता तरी येत 
नेमकं  काय होतय  आज कळतच नाही 
उदास झालाय  आज जीवन 
लक्ख चांद्ण्यात  सुद्धा 
शिशीरातला काळोख दाटलय आज.............
मन एका जागेवर स्थिरावतच  नाही 
रंगीबेरंगी फुलपाखरासारखे  
ह्या फुलावरून त्या फुलावर धाव घेताय 
ह्या मनातील भावना कुणातरी जवळ 
मोकळ्या कराव्या  वाटतात 
पण जवळचे आहे तरी कोण...........
सेवटी  हाताची उशी करून 
हमसून हमसून रडतोय आता............
मन तर खूप हळवे आहे 
काय करावे कसे समजवावे 
कळताच नाही 
त्याला सुधा कळले असेल 
कि, 
ह्या जगात हक्काचे कुणीच नाही  

मोहन कु-हाडे 

=======================================================================

 कोटाची बटन तरी ........!!!

सूर्य उगविल्या पासून तर मावळे पर्यंत
आम्ही रहदारीच्या वाटेवर बसतो,
आई, बाबा येतील पाच दहा पैशे देणार म्हणत,
मात्र आमच्या त्या विनवणी कडे
कुणीच लक्ष देत नाही......
अखेर पाच दहा पैश्यांच्या अपेक्षेने
जे हात लोकांसमोर पसरलेले असतात
ते पुन्हा मागे सरावे लागतात गळून आले म्हणून ,,,,,,,,,
पुन्हा तेच हात लोकांसमोर पसरले जातात
त्यांना थोडा आराम मिलाल्या नंतर.......
आणि पुन्हा तेच आई बाबा पाच दहा पासे देणा........
असेच एका साहेबाला पाच पैशे मागितले
त्याने नुसते त्या विनंतीकडे कटाक्ष्य टाकून बघितले
अन तो पुढे निघून गेला, आणि
दुसयाच एकाने दहा पैशे दिले ........
तेव्हा एका कीर्तनाची आठवण झाली
त्यात एकले होते कि ,
सारी देवाची लेकरे म्हणून
मात्र हे सर्व मला खोटे वाटले......... कारण
सर्व देवाची लेकरे असल्या नंतर
एक एवढा कंजूस का ?
आणि दुसरा एवढा दयाळू का ?
सारी तुझीच लेकरे असताना
जर तू एकाला कोट दिला तर
मला निदान कोटाची बटन तरी ...........

मोहन कु-हाडे .........


===================================================================

बायकांचा समाज................

तुझा नि माझा संबंध हा
फार पूर्वीचा आहे ,
तूच तर माझी लाज लोकांसमोर
मांडायला लावलीस ,
आणि आता तुच माझ्या
कडे बघून हसतोस,
जर का तू माझ्या कडे एक डोळा
उघडून बघितले असते, तर
केवळ ह्या टीचभर पोटासाठी
अशी देह विक्री मला करावी लागली नसती
समाजाच्या चर्चेचा विषय झाली नसती ,
ज्या समाजात मी जन्मले
ज्या समाजाचा प्रत्येकास गर्व
असते
अशा समाजाला सोडून
मी आमच्यां बायकांचा समाज म्हटले
नसते 
लोकांचे टोमणे एकले नसते
बायकांनबद्दल अपशब्द बोलना-यांचे
तोंड ठेचण्याची आजही ताकद माझ्यात आहे
मात्र हे सगळ करायची शक्ती असुन
फक्त तून माझे गात जर बंद केले
आणि तोंडाला मुचके लावले .....................

 मोहन कु-हाडे ............

===========================================
 कुणी तरी असावं ..................
मला सुद्धा वाटतय कि ,
कुणी तरी असावं ,
आपल्या कविताना न्याय देणांर
नकोत ते फक्त चं सुंदर म्हणनार ........
असावं कुणीतरी चार शब्दांची
प्रतिक्रिया देणारं ..............
जर भरकटलेच माझे शब्द
तर लगेच चूक लक्ष्यात आणून देणारं ................
आता तर आमच्याच शब्दांचा
 अर्थ आम्हाला कळेनासा झालाय
कारण समजून सांगणारे
येथे कुणीच नाही उरलं .............


मोहन कु-हाडे ..................


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा