आखरी भेट ..................!!!
तुला आठवते का ?............कॉलेजच्या गेट मधून जेव्हा मी बाहेर पडलो, तेव्हा
अचानकच तू माझ्या समोर आली, आणि जेव्हा तुझी नजर माझ्यावर गेली,
तेव्हा तू एवढी सुंदर हसली होती कि, ते सांगायला शब्दच नाही माझ्या कडे. आणि
आपला हात अलगत तोंडावर ठेवला. ते तुझे हसणे, तुझ्या चेहऱ्यावरील हव भाव मी
आयुष्यात कधीहि विसरणार नाही. तुला मी बोललो होतो "कशी आहेत "...........
त्यावर तूनुसती हसतच होतीस कारण आपल्या भेटीने तू खूपच शहारली होती.
तुला काय बोलावे हेच कदाचित काळत नव्हते, म्हणून तू नुसती हसतच होती.
चालत असता मी बसण्या साठी एकांत जागा शोधात होतो.
पण काही फायदा झाला नाही. बोलत बोलत कधी तुझा क्लास आला, हे कळलेच नाही.
तुला क्लास मध्ये सोडून मी कॉलेज च्या बाहेर आलो. कारण मी तुझ्या
कॉलेज मध्ये नव्हतोच. खरे तर त्या दिवशी हद्दच झाली. चक्क तुझे कॉलेज सुटे पर्यंत मी
कॉलेजच्या गेटवर उभा होतो. का नाही उभा राहणार मी, कारण तू एवढ्या दिवसाने
भेटतेस म्हटल्यावर अस्वस्थामा सारखा उभाच होतो.
तुझे कॉलेज सुटले, आणि परत आपण बोलत बोलत रस्त्याने जात होतो.
पण आपण बोलत असता मला तुझ्या बोलण्यातून असे जाणवत होते कि,
मी आता तुला आवडत नाही. पहिल्या सारखे तू प्रेम करीत नाहीस. पण,
एक मन म्हणत होते कि नाही "अरे हि तुला खूप दिवसाची भेटतियना
त्या मुले कदाचित असे जाणवत असेल"............ बोलत असतानीच तुझा
घराजवळील एरिया आला आणि तू मला म्हणाली कि, "येथे माझ्या ओळखीचे लोक
आहेत आपण उद्या भेटूया ".............
नि तू तुझ्या घरी आनि मी माझ्या घरी निघून आलो.
मोहन कु-हाडे ..............
तू खुश होती कि नाही माहित नव्हते. पण मी मात्र खूपच खुश
होतो, कारण माझे दूर गेलेले प्रेम मला आज परत मिळाले होते .
माझ्या मनाला खूप बरे वाटत होते. पण तुझ्या मनात काय चालू होते
याची मला तीळ मात्र कल्पना नव्हती. आणि अश्याच भेटी गाठी मध्ये चार ते पाच
दिवस निघून गेले. आणि या चार पाच दिवसात तुझ्या मनातील काय
घालमेल झाली ती मात्र मला काहीच माहित नव्हती . असेच तुला मी जेव्हा पाचव्या दिवशी भेटलो. तू मागे वळून बघितले कुणी येत आहे का तू थांबली, माझा हात आपल्या हातात अलगत घेत मला विश्वासात घेत म्हणाली. " तुला काही सांगायचे आहे. पण कसे सांगू हेच मला काळत नाही. कसे सांगू, ,,,,,,,,,,,,,,, कुठून सुरुवात करू. .............तू मला समजून घेशील ना रे.......हे बघ नाराज होऊ नकोस प्लीज. हे बघ तुझ्या कडे जे माझे फोटो आणि पत्र आहेतन ते फाडून तक नाहीतर मला वापीस आणून दे . मला माफ कर रे मी काही करू शकत नाही. तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर .
तू घेतलेला माझा हात तुझ्या हातातून कधी सुटून गेला हेच कळले नाही मला शिशिरातल्या काळोख्या रात्रीत रात किड्यांचा जस आवाज येतो तसाच माझ्या कानामध्ये आवाज घुमत होता. दिवसा काळोख्या रात्रीतले काजवे चमकू लागले . काय बोलावे कसे तुला समजून सांगावे काहीच ललत नव्हते. आणि जेव्हा भानावर आलो तेव्हा मात्र तिथून निघून गेली होती
त्या दिवशी मी घरी खूप उशिरा गेलो कारण लाल बुंद झालेले डोळे घरच्यांना दिसायला नकोत म्हणून. पूर्ण रात्रच जागून काढली ग मी त्या दिवशी. ती रात्र कशी गेली माझे मलाच ठाऊक. दुसर्या दिवशी माझ्या कडील तुझा फोटो आणि काही पत्र तुला देण्या साठी मी तुला भेटलो , तू पण त्या दिवशी नाराजच होती तुझ्या चेहर्या वरचे हव भाव सांगत होते तसे. मी तुला तुझा फोटो जेवा दिला ते पत्र दिले ते तू न वाचताच टराटरा फाडून टाकलेस. काहीही मागचा पुढचा विचार न करता. आग तुला माहित नसेल कदाचित. जेव्हा तू ते फाडीत होती ना. तेव्हा असे वाटत होते कि आपल्या छातीमध्ये कुणी तरी चाकूचे वाराच करीत आहे. पण तुला काय त्याचे. तुझे काम तर फत्ते झाले होते ना. मी तुला बोललो "अग काय चुकले माझे तेवढे तरी संग , नाही प्रेम करायचे तर नको करू पण काय झाले ते तरी संग. अग काय कमी केले ग मी तुला. कुठे गेल्या आता त्या तुझ्या आणा भाका. कुठे गेल्या त्या आठवणी कि जे कधीही नाही विसरायचे आपण एकमेकाना सांगत होतो. पण का यार का संग मला "..................... पण तू काहीही न बोलत निघून गेलीस नेहमी नेहमी साठी ............................ पण ह्या नंतर मला कश्या प्रकारचा सामना करावा लागला हे मलाच माहित. पण एक सांगतो तू जिथे कुठे असशील ना तिथे तू सुखी रहा. हीच मी देवा जवळ प्रार्थना करेल बाय ..................
मोहन कु-हाडे
=====================================================
बारशे .................!!!
काल असेच एका दोस्ताच्या घरी गेलो. त्याच्या घरची गर्दी बघून मी तर चाटच पडलो. विचार केला कि याच्या घरी मी एवढी गर्दी कधीच बघितली नाइ आन आज हे काय झाले असेल . थोड्या वेळा साठी मी त भेलोच. मी माया दोस्ताला आवाज दिला "सद्या काय करतोय बे घ रात येणा बाहेर".... सद्या घरातून बाहेर आला. " अरे हनम्या काय रे कामून बोंबलून रायला बे.... अबे पावणे हायेत न बे माया घरी"......... "अरे सद्या मी तेच म्हणत होतो कि येवळी गर्दी कामून हाय तुया घरात, अबे कोणी गचकला कि काय बे?"...... "अबे सायाच्या हनम्या अस नको बोलू. अबे माया बायकोची ओटी कि काय ते हाई ना बे लेका. अबे बायकोचे सारेच्या सारेच सोयरे आले लेकाचे, झाळू न पुसून, केचकले बुडे, बड्या ते पण आलेत लेका ".........." कारे तुयाली लायनी साई आली नाई का बे ? ".......... " आली ना बे तेय आली, पण बाबू हनम्या तुले आताच सांगतो की लफड बिफल नोको करू नाईतन मागच्या सारखच करशीन, आन आन्शीन लेका घरावर गोटे ".......... " नाई बे आत मी सुधार्लोना लेका"......... "ठीक हाय ये घरात् "........ दोगेही घरात जातात. ह्न्म्याची नजर सद्याच्या साई वरच असते . पण ते की केल्या त्याले दिसत नाही. ते असते चुय्लीजवळ रांधत. त याले कुठची दिसेन .
इकडच्या तिकडच्या गपा गोष्टी होतात थोड्या वेळातच सध्यच्या बायकोचा ओटी चा कार्यक्रम संपून जातो. आणि उरते तो फक्त जेवणाचा . जेवण क-याले बसतो तवा सध्याची साईच मले वाळ्याले येते, तवा मावा जीवात जीव येते, मी तिच्याकडे टकामका पायत रायतो, तवा सध्या मले हळूच बरीक चिमटा घेते. तवाच मी भानावर येतो. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर येतो, तंबाखू बिम्बखु खाऊन पिचकार्या मारून झाल्यावर आमी घरात येतो. तो पर्यंत घरातील सर्व लोकांचे जेवण होऊन जातात अन मग उत येते तो रिकाम्या गोष्टीले मंजेच सध्याच्या होणार्या बाळाचे नाव काय ठेवायचे . कोणी काय ठेवते कोणी काय ठेवते. येव्ळ्यात सध्याच्या बायकोची केचकली आजी.... "आवं गावकर्णा तुले जर पोरगा झाला त त्याच नाव पिंट्या ठोव आन पोरगी झाली त तीच नाव पिंन्टीच ठेव"......... हे आईकून सध्याच्या बायकोचा आजा ताटकण उभा रायाते अन बोंबलते "आवं हेम्बळ तोंडे तुले काय समजतेवं अवं आताचा जमानां विंटरनेटचा हाये . तुया वेळेसच हाये काय? मोठी आली पिंट्या पिंटी वाली . ते काइ नाही मी म्हणतो कि , पोर्गाच होईन आन त्याच नाव अभिषेखाच ठेवू "........ (बुद्याले अमिताभ बच्चन लायेच आवळ्याचा अस वाटते) . यावर सद्याचा सासरा लगेच लगेच " बबा तुमाले कसे माईत कि पोर्गाच होईन म्हणून, तुमी काय डाक्तर बिक्तर हायेत कि काय आन पोरगीच झाली त"........... यावर सध्याची माय "हम्म्म्म बोंबला, आता पासून नाट लावली या माणसान" .............यावर सध्याचा सवा "भलती नोक लवू हो बाबा पोर्गाच होईन".......... वासरात लांगली गाय शायणी म्हणून मी बोललो कि, "अहो पावणे मी काय म्हणतो जवा होईन तवा पाहू आपण, काय नाव ठेवायचं ते" ......... मायाले बोलणे आयकून सध्याच्या साईन मान हालविली. तवा मले लायेच बर वाटलं आन तवा ते पण बोम्बली कि "बाबा खरेच जवा होईन तवा पावू".......... सध्याच्या बापाने थोडी घेतलीच होती आन लग्नातला थोडा राग पण काळ्याचाच होता म्हणून आता पेंग्लेला सध्याचा बाप बोंबलला... " हेपा इवाई जवा होईन तवा पावून घेवू आमी आताच तुमी काही झिलप्या पाळू नोका . आमचे अमी पाहून घेवू".......... सध्याचा सासरा... " इवाई मी काय म्हणतो काय फरक पडते आताच बोललो त".............सध्याचा बाप " अस कस म्हणता तुमी इवाई काय फरक पडते. हेपा माव पोरग माईच सून आणि होणारा मायालाच नातू काय क-याचे ते आमीच करू . मोठे आले नाव ठेवणारे . पायले लग्नातल्या पैशायायचे काय झाले ते संगा".......... सध्या " बाब मी काय म्हणतो जवू द्याना आता ते गोष्ट कायले उकरून काढता"............. बाप "तुले नाही समजत बे हेम्बल्या मोठा आला जाऊ द्याना म्हणणारा"................ मले असे वाटे कि सध्याचा बाप आता लग्नातल्या गोष्टी उकून काढते म्हणून मी सध्याच्या बापाला बाहेर घेऊन गेलो आणि त्याना समजून सांगु लागलो. पण सध्याचा बाप काही आय्क्याच्या मान्स्तीतीत नोता . त्याय्ले गावातल्याच एका माणसाच्या घरि घेऊन गेलो आन मी वापीस सध्याच्या घरि आलो.......... एवढ्यात सध्याची बहिण बोंबलते." मी काय म्हणते आपुन होणार्या बाळाचे नाव तो झाल्यावरच ठेवले त"......... सारेच जन हो म्हणतात. सायचं हुकलं याही वेळेस सध्याच्या साईले परपोस करयचं. नाव त काई ठेवले नाई पण ........................!!!
मोहन कु-हाडे ...........
===========================================================
मास्तर राम राम....!!!!
मास्तर राम राम....
आव मास्तर माया पोरले तुमच्या शाळेत टाकायचे म्हणतो, पण तुमचे मास्तर लोक म्हणत्यात कि, ये।.......... सद्या ..... अमच्य शाळेत फकस्त 450 मुलेच बसू शकतात . आता तुया पोराच नाव आम्ही घेणार नाय।. आव मास्तर आता काय करू मी अडाणी माणूस, कुठ जावू मी माया पोरले घेऊन शिन्या .
मास्तर अस कस हो तुमच्या शाळेच . म्या त लय नाव आईकलं होत बोभाटे मास्तरच्या श्याळेच .आव तुमच्याच शाळेचे इद्यार्थी सांगत हुते कि, सदा काका आमची शाळा लयच चांगली हाय . आव सिरीराम आण,संतोष यायन माया पोट्ट्याले भळकवल म्हणले कि, अबे आमच्या शाळेत ये लय झाक हाय , मास्तर बी लई झाक हायेत, अन इद्यार्थी त लयच झ्याक हायेत . अबे आपल्या शाळेच हेडमास्तर तर लायेच झ्याक हाये .
मास्तर आत मी काय करू माया पोट्टा त लएच दंगळो करत हाय , त्यो म्हणतो कि मी जाईन त बोभाटे मास्ताच्याच शाळीत नाय त नाय जाणार . मास्तर तुम्हीच सांगा आता मी काय करू, मास्तर तुमच्या एका बाबूने पण सांगितलं कि, आमच्या हेडमास्तरची परवानगी असेल तर आमी मुलाले शाळेत घेऊ. आता हे व काय मास्तर, आव आमच्या सारक्या अडाणी माणसाने कुठी जावं , आव मास्तर मावा पोरगा लयच हुशार हाये बगा . काल त्याच्या मामाच पत्र आल हुत, त्यानं ते पटापटां वाचलं बघा. आन त्याले मग म्या पंधरा पैसे देले अन म्हणल कि , हनम्या एक पत्र घेऊन ये आन ली तुया मामले पत्र, त्यो बी गडी पयतच गेला आन आणल पत्र , अन लिव्ल गड्यान मामले पत्र .
मस्त लयच गुणी पोरग हाये बगा. आव मास्तर एक सांगू का तुमास्नी, मागल्य वर्सालाच तुमच्या शाळेत मी त्याले टाकणार होतो, पण मी ऐकल कि आत्चे मास्तर लयच हुशार हायेत, जे पोट्टे हजर असतात त्यायची हजेरी घेतच नाइ अतचे मास्तर, फकस्त ............
आता हे जर आतच्या मास्तराय्ले माहित झाले त ते माया पोराचा राग करतील, नापास करतील, नाय त लयच तरास देतीन , पण मास्तर हे तुमच्या मास्तर हे तुमच्या मास्तराय्ले सांगू नका बर. नाय त मावा पोरगा श्यालेतच नाय येणार
बर येतो मास्तर मी।..........
मोहन कु-हाडे ......................
===================================================
मी येणार नक्की येणार ..................!!!
आपणा सोबत आहो .

नमस्कार मित्रानो कसे आहात आपण सर्वे ...!!! तुम्ही तर नाराजच असणार माझ्यावर आहे ना .तुम्हा सर्वाना माझ्या येण्याची हुरहूर लागली असेल पण मी येतच नाही. हे बघून मला शिव्या पण देत असणार ना आपण...!! पण आपला मला शिव्या देऊन काही उपयोग नाही. कारण मी न येण्याला आपणच जबाबदार आहात. प्रामाणिक पणे कोणी सांगू शकेल का कि, माझ्या आप्तांवर किती लोकांनी कु-हाडी
चालविल्यात किती लोकांनी आमचे संसार उधवस्त केलेत . सांगेल का कुणी नाही ना .........?. मग मला शिव्या द्यायचा अधिकार पण आपणाला नाही. अरे सागराला मागे सारून तुम्ही लोकांनी भाल्या मोठमोठ्या इमारती बांधल्यात आमच्या आप्तावर कु-हाडी चालून कान्क्रीटची जंगले उभारलीत. लागेल तेवढे प्रदूषण केलेय तुम्ही, आणि मला निर्जीव करून सोडले. येरे येरे पावसा म्हणून मला बोलावता . आणि पैसा मात्र कुणीही देत नाही. अरे मला त्याची गरज पण नाही रे . मित्रांनो आताही वेळ आहे, जंगले वाचवा झाडे वाचवा त्यावर कु-हाडी चालवू नका. प्रदूषण टाळा, मी नेहमीच
आपणा सोबत आहो .
मित्रानो मी येणार मी तुमच्या सारखा निर्दयी नाही . मी येणार येथील बळीराजा साठी, मला यावेच लागणार येथील बच्चे कंपनी साठी, मला येवेच लागणार येथील प्रियकर प्रीयाशिला चिंब करण्या साठी, सगळेच माझी आतुरतेने वाट बघत आहात ना, मी येणार नक्की येणार ..................!!!
=========================================================
नेमकेच उन्हाळ्याचे दिवस संपले आणि आता पावसाळा चालू होणार होता. जिकडे तिकडे शेतातील कामासाठीची धामधूम चालू होती. गावातील लहान मोठे शेतकरी आपआपल्या शेतीची मशागत करायला लागले होते. अश्यातच एक छोटा शेतकरी रामराव "आवं पारे तुले माहित झालं काय व आव त्या श्यामरावण त्याच्या मईच्या वावरात निंबाच्या झाडले फाशी घेतली "........ परी घाबरून......."आव काय सांगताय काय, रामाच्या पायरी आन कामून असं केलं व त्यायन " ............ " अवं, सरकारी कर्ज आन गावातीलय बुचुबुचू कर्ज. आन त्यातच पोरगी पण आली ल्ग्नाले आल असीन लेकले टेन्शन ".............पारी हळहळव्यक्त करीत " सांग व आता कसं होईन बिच्यार्यायचं ".......... पारी आपल्या नवर्याकडे कटाक्ष टाकून बघते तेच रामराव तिले म्हणते " तू अशी कामून पयत व माया इकडे "............ पारी आपल्या नवर्याला समजावत " मी काय म्हणते पुढच्या वर्षी उरकून टाकू बालीच लग्न ते सरू सांगत होती कि दर्यापूरला एक पोरगा हाये त्यच्या घरी दोन एकर वावर पण हाये "......... रामराव मधेच बोलतो....... " हो करुन टाकू, पुळच्या वर्षले पण आता आपल्या जवळ जे बकरी आन एक पाठ हाये ते मी इक्याले नेतो सकाय दर्यापूरच्या बजारात आन जे पैशे येतीन त्या पैश्याने बी बेन आणतो आन मग आपण वावर पेरून जे पिक यईन ते पैशे आपुन बालीच्या लाग्नाले ठेऊ. बर जाऊ दे मले सकाय सकाउनच उठवजो, मी जाईन बजारात ".............. पारू " हो हो "..........!!!
पारू सकाळीच उठते आणि आपल्या नवर-याची शिदोरी बांधून मग आपल्या नवर्याला उठवते . रामराव झोपितून उठून तयार होते चहा पिऊन झाल्यावर आपली एक बकरी आणि पाठ (बकरीच पिल्लू) घेऊन सकावूनच पाच वाजता बाजाराच्या रस्त्याने जाते. बाजार 15 किलोमीटर असल्या मुळे त्याला सकाळीच निघावे लागते. कसाबसा तो 7 वाजता बाजारात पोहचतो आणि आपल्या बक-या घेऊन उभा राहतो दलाल लोकांची वाट बघत बसतो. दलाल लोक येतात भाव करतात आणि निघून जातात. दलाल लोक पण त्याची मजा घेतात. बाजारात खूप घासाघीशी केल्या नंतर तो आपल्या बक-या एका दलाला विकतो आणि थेट बियान्याच्याच दुकानात जाऊन बसतो. आणि आपल्या चार एकराला पुरेल एवढे कपाशीचे बियाणे घेतो. आणि थोडे फार खत व पोरले भात्क बीत्क घेवून घरी येतो.
दुस-या दिवशी पारी आणि रामराव आपल्या शेतात जातात आणि शेवटची मश्यागत करतात.आता पावसाला चांगली सुरुवात होते गावातील लोक आपआपले बैल आणि तीफानी घेऊन शेत पेरतात. पण रामराव जवळ ना बैल ना तिफण काय करील बिचारा, तो आपले शेत पेरण्या साठी गावातील लोकांच्या खुप मिनतवा-या करतो पण त्याचे काम कुणीही करीत नाही. कारण आपापले शेत पेराचीच सुचते सर्वाना. अश्यातच 5 दिवस निघून जातात . तेव्हा कुठे त्याला एक बैलजोडी मिळते व तो आपले शेत पेरून घेतो.
शेत पेरून झ्याल्यावर दोन चार दिवस चांगला पूस होतो रामराव व त्याची पत्नी पेरणी व्यावस्तीत झ्याली म्हणून खूप खुश असतात रामराव वेळ मिळेल तेव्हा आपल्या शेतावर जातो आणि आपले पीक पाणी पाहत रहातो तो लैच खुष असतो पण अश्यातच लवकरच त्याच्या खुशिला विरजण लागतो .
आता पाऊस पूर्णपणे थांबून जातो पंधरा दिवस होवून जातात पण पाण्याचा एकही थेंब पडत नाही. गावा मधील लोक पाउस आला पाहिजे म्हणून देवा कडे साकडे घालतात . गाव जेवण सुद्धा देतात पण पाण्याचा ये थेंबही पडत नाही. पूर्ण गाव काळजीत पडले. त्यातच रामराव सुद्धा काळजीत पडते. आश्यातच एक दिवस रामराव आपल्या शेतातून संध्याकाळी घरी येतो आणि डोक्याला हात लाऊन बसतो घरात विचार करीत. एवढ्यात पारू दुसर्याच्या शेतातून काम करून घरी येते आणि आपल्या नवर्याला म्हणते .............." आव कामून डोक्ष्याले हात लावून बसले संद्याकाय च्या पायरी बुवा-या सारखे '...............रामराव " आव परे आताच वावरातून आलो पारटी पुरी सुकली पारे या वर्षी काई खंर नाही आपलं'............." आव मी काय म्हणते येईनच ना कुठी जैन ते "................ एवढ्यात पारी आपल्या मुलीला चहा ठेवायला सांगे. आव बाले चहा ठेव आमच्या साठी "............" आव येईंत खंर पण कई सांर पिक मसणात गेल्यावर मग काय कामच लेकाच कितीकय आलं त "...................."आव ज्यानं पोट देलं तो दानाबी देईनच ना ".............. " सासायाचा असा इचार केला होता कि या वर्षी पाणी पाउस बरा होईन कापसाच पिक पन चांगले होईन चांगला गाठीले पैसा पण येईन आन मग उरकून टाकू बालीच लग्न पण आत मले नाई वाटत कि हा येईन म्हणून "..................पारू नाराजीत "कुठी अळून बसला रे बापराज्या येणा राज्या लवकर कामून अशी गरीबाची परीक्षा घेत राज्या "................. तेवढ्यात बाली चहा घेवून येते दोघेही चहा पितात पारू स्वयंपाकाला लागते आन रामराव बाहेत लीलांमध्ये बसायला जाते .
खेड्यात संध्याकाळी शेतातून लोक घरी आल्यावर आपल्या रोजच्या घडलेल्या गोष्टी करण्या साठी आपाआपल्या पारावर बसतात . कोणी काय म्हणतो कोणी काय म्हणतो . एकजण ' अहो आबा मी आताच टीव्ही पावून आलो त्यात ते बाई सांगत होती की, आता पाणीच येणार नाई . दुबार पेर्णी करून काहीच फायदा नाही .सायाचे लायेच पापी लोक झाले आता कसे काय पानी येईन. जा मरा सायाचेहो"........... इकडच्या तीकडच्या गोष्टी झाल्यावर रामराव घरी येतो जेवण करण्याची इच्शा नसतानी कसाबसा जेवण करते. काय करील बिचारा आन दुसरे काय करू शकते आसवे गाळन्या शिवाय.
पण तो हिम्मत हारित नाही . पण पारीला आपल्या नवर्याची खूपच काळजी वाटायला लागते. तिला वाटू लागते कि शामराव सारखे आपल्या नवर्याने करायला नको आणि आपल्यां नवर्याने असे काही केले म्हणजे ??? तिचे विचार चक्र आता जोरात चालू होतात काय करावे काहीओच कळत नाही. जर या मणसाला कुणी पासे नाही दिले म्हणजे ??......... " अरे देवा आता कसे रे करू मी काही तरी वाट दाखव बाबा तूच "........ पारू कडून आता राहाव्ल्याच जात नाही म्हणून ती रामराव ला म्हणतेच ......."अवं मी काय म्हणते लिनी नाही देले पासे त जाऊ द्या बलीच लाग्न्न आपण पुढच्या वर्साले करू. की काय्जी करू नका. आपण हात मजुरी करून भागवू कसे तरी औंदाच्या साली . आन मी काय महाते तुमी कट्या शामराव सारखे काही करू नका पुढच्या वर्षी चांगला पबुश झाला कि आपण पेरणी करून चांगले पोईक घेवू आन मग करू बलीच लागण ."........... हे सारे ऐकून पारूच्या डोळ्यात पाणी येते . पण रामराव शांत स्वभावी आणि विचारी असल्या मुले असे विचार त्याच्या मनात येत नाहीत . तो आपल्या बायकोला समजावून सांगतो .........."आव तू काय मले पागल बीगल समजली कि काय व मी काय एवढा पागल हव काय तुले काय वाटले कि मी जीव देईन अन मी जीव देवून काय होईन, आपलं वावर कोणी पेरून देईन काय कि आपल्या पोरीचे कोणी लाग्न्न करून देईन. परे घरात उपाशी राहू पण अस भल्त सल्त नाही करणार आव मी काय पळपुटा नाई , आव नाही या वर्षी त पुढच्या वर्षी पेरू आपल वावर पण मी अस खी करणा नाही मायावर विस्वास ठेव. जातो सायाच पाटलाच्या घरी आन मागतो त्याले काही पैसे. सायाचा असा विचार केला होता कि या वर्षी चांगला पावूस आला त चांगला पैसा भेटीन आन मग उरकून टाकू बालीच लागण पण आता मले नाही वाटत कि हा येनीन"................
अजूनही राम्राव्ची आशा संपलेली नाही त्याला वाटते कधीतरी पावूस येणारच आहे म्हणून तो दुबार पेरणी करण्याच्या तयारीला लागतो कारन आता पावसाने जरा बरा जोर धरला होता त्याला गावातील लोक दुबार प्रेर्णी करीत होते पण रामरव कडे पैसे नव्हते म्हणून तो पैश्यान साठी पाटलाच्या घरी जातो .........." पाटील मले थोळेशेक पैशे पायजे होते लेकाचे, वावर पेर्याले "........... पाटील रागातच ......" अरे तुमाले देवून काही फायदा नाही बे, तुमी लळून पळून पैसे घेता लेको आन दियाच्या वेळेस मोठे जीवावर येते, जाय पैसे नाईत माया जवळ "..............रामराव पार रडकुंडीला येतो ............ . " अहो पाटील मागच्या वेळेस म्या नेलते पासे तुमच्या जवळून त म्या देले होते न वापीस "....................." हो रे देले होते पण कवा किती दिवस लावले लावले बे तुया वापस क्र्याले "................ " अहो पाटील आता असे नाही होणार मी बरोबर पिकावरच तुमचे पैसे वापीस करील "........................" हेपाय बाबू तुले पैसे देतो खरी पण माया पैश्याय्ले उशीर केला त माया सारखा वाईट नाही कोणी तुले त चांगल्या माहित हाय आपला दणका "......................पाटील राम्राव्ला पैसे दोतो रामराव लगेच घरी येतो व द्र्यापुर्ला दुकानात जावून कपाशीचे बियाणे आणतो.व आपले शेत पेरून घेतो . काही दिवसाने पिक पण याते रामराव व त्याची पत्नी खूपच खुष असतात. पिक घरी येते चांगला पैसा पण मिळते.आता ग्घ्रात आबाघानी असते काही दिवसाने बळीचे लग्न पण होते घेतलेले पाटलाचे पैसे ते पण वापीस होतात .
( मित्रांनो या कथेमागिल उद्देश एकाच आहे जर नापिकी झाली तर आत्महत्या करायच्या नाहीत डगमगून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तोंड द्या. राम्राव्ने व त्याच्या पत्नीने या वेळी एकमेकांची साथ दिली त्यांनी जर हे केले नसते तर ..........................................................)

Posted 16th July
मोहन कु-हाडे.................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा