गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

माझ्या उद्याच्या जिन्याची .................!!!

माझ्या उद्याच्या जिन्याची .................!!!


माझ्या उद्याच्या जिन्याची

आशा हि तूच होती

माझ्या हर गीताची

भाषा हि तूच होती


सांगून गंध गेला

तुझे बरेच काही

माझ्या मनाच्या बागेतील सुद्धा

तूच गुलाब होती


आणि लिहायचे नाही

तव प्रती मला काही

माझ्या स्वप्नाच्या दुनियेतील

अप्सरा हि तूच होती ................


मोहन कु-हाडे ...........!!!
==================

मालवून टाक दिवा सखे ....................!!!

मालवून टाक दिवा सखे


रात्र खूप झाली आता


चांदण्यांच्या प्रकाशाने


झोपडी लक्ख झाली आता


घेतले कुशीत आकाशाने


चंद्र तारकांना


घे मिठीत मला तू सखे


रात संपून जाईल केव्हा


रेशीम गाठ बांधली जेव्हा


स्वप्नही खूप बघितले आहे


घे मिठीत सजनी मला आता


रात्र लख चांदण्यांची आहे .................

मोहन कु-हाडे

===============

दोघेही मुकेच होतो ...............!!!

तुही तशीच होती

मीही तसाच होतो

भेटीच्या पहिल्या वेळी

दोघेही मुकेच होतो ...............



प्रीतीच्या हर खुणेला

तू साद देत होती

सत्य क्ठ्न्या तुला मी

मनात भीत होतो ...................



माझ्या नयनांच्या शरांनी

तू घायाळ होत होती

सावज तूच होती

शिकारी मीच होतो................



मोहन कु-हाडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा