गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

माहा बळीराज ..................!!!

माहा बळीराज ..................!!!

वावरत काम करे
थकलेला बाप
म्हणून त्याले म्हणतात
माहा बळीराज
हो सारे बळीराज

स्वता राहून उपवाशी
घास  घाली  जगाला 
राहून स्वता अनवाणी
बूट घाली सायेबाला 
दरबारी सायेबाच्या
काहीच नाही मान
म्हणून त्याले म्हणतात
सारे बळीराज

उन्हां मध्ये लाही लाही
करते त्याचा जीव
पावसात घेऊन घोंगड
फिरतो रानो रान
पर्वा नाही कशाचीही
तरी करते  काम
म्हणून त्याले म्हणतात
माहा बळीराज

बांधावर उभा जसा
माहा विठूराय
नागमोडी चालत येई
जशी रुख्माय
झाडा खाली तुरीच्या त्या
खातात भाकर
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज

पोया मदे बैल सजवे
असा माया बाप
घाट लावी मस्तकाले
खांद्याले त्या तूप
पाठीवरी  झूल टाके
कपाळी बाशिंग
असा आहे गुणवान महा बळीराज
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
("हंबरून वासराले चाटते जशी गाय" . ह्या गीताच्या चालीवर मी
हा एक छोटासा प्रायत्न केला आहे मला आशा आहे कि आपणाला नक्की हि कविता आवडेल )

मोहन कु-हाडे  ...................!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा