माझा प्रियकर.................!!!
माझा प्रियकर येईल तो
माझ्यावर खूप प्रेम करेल
तो आज येईल उद्या येईल
म्हणून मी वाटेवर उभी आहे
दिवसा मागे दिवस येऊन गेलीत
रात्री मागे रात्र जागून काढल्यात
वा-याने दार जरी वाजले
तरी वाटायचे
आला असेल माझा प्रियकर
मी धावत जायची दरवाज्या जवळ
दार उघडून बघायची ..................??
मग निराश मनाने शय्येवर येऊन बसायची
श्रावणातल्या धारा बरसल्या तेव्हा वाटायचे
कुठे असेल आता हा
स्त्याने चालत तर नसेल ना हा ?
त्याचे कपडे पावसाने चिंब तर झाले नसेल ना ?
इथे जर तो चिंब झाला असता
तर घट्ट मिठी मारून माझी उब
दिली असती मी त्याला
वैशाखेच्या उन्हां मध्ये जर चालत असेल
तर माझ्या अंगावर झेलली असती
आणि सावली होऊन चालली असती मी
पण तो माझ्या पासून खूप लांब आहे
मी त्याला सहकार्य कसे करू
देवा हा जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखी ठेव
माझी कमतरता भासवू नकोस त्याला ...........
मोहन कु-हाडे ........................!!!
माझा प्रियकर येईल तो
माझ्यावर खूप प्रेम करेल
तो आज येईल उद्या येईल
म्हणून मी वाटेवर उभी आहे
दिवसा मागे दिवस येऊन गेलीत
रात्री मागे रात्र जागून काढल्यात
वा-याने दार जरी वाजले
तरी वाटायचे
आला असेल माझा प्रियकर
मी धावत जायची दरवाज्या जवळ
दार उघडून बघायची ..................??
मग निराश मनाने शय्येवर येऊन बसायची
श्रावणातल्या धारा बरसल्या तेव्हा वाटायचे
कुठे असेल आता हा
स्त्याने चालत तर नसेल ना हा ?
त्याचे कपडे पावसाने चिंब तर झाले नसेल ना ?
इथे जर तो चिंब झाला असता
तर घट्ट मिठी मारून माझी उब
दिली असती मी त्याला
वैशाखेच्या उन्हां मध्ये जर चालत असेल
तर माझ्या अंगावर झेलली असती
आणि सावली होऊन चालली असती मी
पण तो माझ्या पासून खूप लांब आहे
मी त्याला सहकार्य कसे करू
देवा हा जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखी ठेव
माझी कमतरता भासवू नकोस त्याला ...........
मोहन कु-हाडे ........................!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा