Hi,..........
कसा आहेस, अरे सॉरी तू तर छानच असणार ना........... उगाच
मुर्खां सारखे विचारते मी तुला ...............आता एवढी छान सुंदर प्रियशी
मिळाल्यावर कोण नाराज असणार ............
काय रे, असा
काय गुन्हा केलाय मी, एवढे काय वाईट केले मी तुझे, असा काय रे वागलास तू
माझ्याशी................ अरे, काय कमी केले होते रे मी तुला, साता जन्माची
साथ देशील असेच तू बोलला होता न.............. मग आता कुठे माशी शिंकली
रे............ तुला आठवते का रे?..... आपण जेव्हा कॉलेज मधील सहलीला गेलो होतो. तेव्हा किती मजा
केली होती आपण. ते लहान लहान हिरव्या हिरव्या गवतावरून चालणे, त्याच गवतावरचे दवबिंदू तू माझ्या चेहर्यावर हात ओला करून लावणे, ते खडकावरून चालणे माझा तोल गेला म्हणजे तू माझा हात
आपल्या हातात अलगद पकडणे, धबधब्याखाली चिंब होऊन नाचणे, ते गाण्याच्या
भेंड्या आठवते कर तुला हे सारे.............अरे तुला कसे आठवणार रे...... तू म्हणजे ...........
जाऊ दे, आता तुझी माणशी कशी आहे. खूप प्रेम करत असेल न ती तुझ्यावर. पण हे बघ, तिला तरी खोट्या थापा देवू फसवू नकोस. खूप मन दु:खतय रे ............ आणि बघ, मी देवाजवळ प्रार्थना करेल
कि, तुमच्या जोडीला सही सलामत ठेव. कुणाचीही नजर लागू नको देवू. पण कमीत कमी तिला तरी वा-यावर सोडू नकोस............ खूप
खुलाव तुझे प्रेम, अंकुर पण फुटू दे तुमच्या प्रेमाला............ एवढीच माझी इछा आहे .........
चाल येते मी ..............
मोहन कु-हाडे...................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा