शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

आई..................!!!


आई..................!!!

लिहिले ब-याच जनांनी
लिहितील बरेच काही
शब्द साच्यात बंद होई
महती तुझि ग आई..............



केले तु हट्ट पूर्ण
असता मि बाळ तान्हा
पाजुनी मोठे केले
तुझा तु अमृत पान्हा...............




आई तुझ्या प्रितीचे
जगात ह्या मोल नाही
तव अंगाई गिताने
मज शांत झोप येई....................



आई म्हणु मि कोणा
न साद कूणी देई
हंबरुणी वासराचा
कोरडा हा कंठ होई.....................


आई म्हणु तुला ग
शकुला हा तुझा पुकारी
जरी स्वामि तिन्ही जगाचा
तव विना मि भिकारी  ..................


मोहन कु-हाडे .........................

जेव्हा माझ्या पायात काटा रुततो " ...........!!!

"जेव्हा माझ्या पायात काटा रुततो " ...........!!!


पावसाच्या सरी कोसळतात


तवा काम करतो मी वावरात


माजे दोस्त मात्र


घरी गरमा गरम भज्यांचा स्वाद घेत


घोटावर घोट रिचवतात चहाचा पोटात


आणि कविता करतात


"जेव्हा माझ्या पायात काटा रुततो "


आतून आवाज येतोय


"बेटा भजी कसे झालीत "


"मम्मी थोडे  कुरकुरीत पाहिजे होती "


अरे येऊन बग माया कायां वावरात


पायाले चिखल कसा झोंबते


बंगाली बाभळीचा काटा


टोचून बग पायाले


लाल रगत कस वायते


तवाच कळेल कि,


"जेव्हा माझ्या पायात काटा रुतते "


मिर्गाचा पयला पाउस पडते


तवा मातीचा वास घेतला कधी


जवा प्रीयेशिला भेटायला जातोस


तवा अत्तर लावायला इसरत नाही कदी.................




मोहन कु-हाडे...........!!!

नखरा नवीन आहे ..........!!!

नखरा नवीन आहे ..........!!!


आरसा जरी नवा पण

चेहराही  तोच आहे

चेह-या वरी खुणा त्या

बघण्या डोळाही तोच आहे


कंठात गीत तुझ्या

हृदयात मीच आहे

रंग भ-या गीताला

तू साद देत आहे


डोळ्यात बघ तू माझ्या

हे रुपडे तुझे पण ?

नखरा नवीन आहे

चेहराही तोच आहे .................!!!


मोहन कु-हाडे

फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!

फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!


नयन माझे आतुर आहेत
फक्त तुला पाहण्या साठी


ओठ माझे आतुर आहेत
तुझ सवे बोलण्या साठी


काव्य मी हे लिहित आहे
फक्त तुला वाचण्या साठी


गीत मी हे गात आहे
फक्त तुला ऐकविण्या साठी




जीवन मी हे जगत आहे
फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!


मोहन कु-हाडे .............

मि राग अन तू रागिणी ..................!!!

मि राग अन तू रागिणी ..................!!!



जे एकले होते मी

त्याही पेक्षा तू देखणी

गाऊ आपण प्रेमाच्या गळ्याने

मि राग अन तू रागिणी


होऊनी फिदा तुझ्या स्वभावी

मनी वाटे अर्धांगिनी अशी असावी

जी मिळविल चौघात मान

लक्ष्मीच्या रूपाने तू पत्नी दिसावी


पूर्ण न झाली मनाची माझ्या आशा

ना लागला डोळ्यास डोळा

उघड्या डोळ्यांनी मी पाहिले स्वप्न

चढली होती मदनाची नशा .....................!!!



मोहन कु-हाडे  .................!!!

हे बंध रेशमाचे ....................!!!

हे बंध रेशमाचे ....................!!!


आले फुलुनी सारे
भाव माझ्या मनांचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे

                            वेड तुझेच आहे

                           आतुर ह्या पापन्याना

                            ऐकून घे सखे तू

                           हे गीत भावनाचे


छेडू नकोस तारा

मन झंकारते हे माझे

दु:खी मनास माझ्या

पूर येती आसवांचे...................!!

मोहन कु-हाडे .............!!!

अबोलीचा बहाणा कशाला ......!!!

अबोलीचा बहाणा कशाला ......!!!

भाव तव मनातले
कळूनी जरी  चुकले मला
नित्य जुज पाहुनी
मन पिंज-यात कोंडू  वाटे तुला


स्मित हाश्याने जणू
वेडे केले मला
तुझ्या ह्या प्रियाची
कशी कीव येत नाही तुला


तव नयन कमलांचा
सुगंध मनी दरवळला
मनी प्रीत असुनीही
अबोलीचा बहाणा कशाला
अबोलीचा बहाणा कशाला 
अबोलीचा बहाणा कशाला ......!!!


मोहन कु-हाडे 

एकदा येणे एकदा जाणे ...................!!!

एकदा येणे एकदा जाणे ...................!!!

एकदा येणे एकदा जाणे
हि तर जगाची रीत आहे
मरते वेळी सोबत काहीच येत नाही
तरीही तिचेवर प्रीत आहे


जन्मा पासून तर मरेपर्यंत
माणसाला हाव आहे
खोटी कामे करून करून
कितीही श्रीमंत झाले तरी
पळसाला पानाची संख्या तीनच आहे


तहान्लेल्याना  पाणी
भूकेलेल्याना  अन्न  ध्या
अथांग अश्या ह्या विश्वात
तरच तुमचे नाव आहे ..............!!!


मोहन कु-हाडे ...............

एकदा तरी भेउनी जा .......!!!

सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेउनी जा .......!!!   

हे प्रीतीच्या फुलपाखरा
निरोप माझा घेऊन जा
सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेटून जा

असलीस जर का तू दूर जरी
माझिया डोळ्या  पासुनी 
आहेस तरी तू समीप माझ्या
हि साद येई हृदयातूनी
सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेटून जा

साद घाली मन हे माझे
साडीस त्या ओ देऊनी जा
सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेटुनी जा

जात आहे मुख हे माझे
काळाच्या मागे जरी
कुठेही जर का असलीस तू तरी
धाउनी ये लवकरी
शेवटच्या घटकेस माझे
मुख हे तू पाहुनी जा
सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेटुनी जा

संदेश मी हा देत आहे
तो भेटला असेल तुला
भेटण्या मला तू जरूर येशील
अशी आस आहे मला
पुढच्या जन्मी मिलनाचे
वचन तू देऊनी जा
सांग तिला मम सजनीला एकदा तरी भेउनी जा .......!!!   

मोहन कु-हाडे .............!!!

रात्र संपली चांदण्यांची .................!!!

रात्र  संपली  चांदण्यांची .................!!!


ना विझला अजुनी चंद्र

ना विझला अजुनी तारा

सखे येणा मिठीत माझ्या

छेडू मिलनाच्या तारा


न कळले  कधी मला हे

कि, रात्र संपली केव्हा

चुम्बुले तू बहाल माझे

मज जाग आली तेव्हा


कर मोकळी गळ्यातील

हि मिठी रेशमाची

चाल उठ सखे आताका

रात्र  संपली  चांदण्यांची .................!!!


मोहन कु-हाडे ..............

भीमा तूच एक बोल होता .................!!!

भीमा तूच एक बोल होता .................!!!

असा माझा भिवा
होता अंधारातील दिवा
सोसुनिया नाना  दु:ख
जगविले कोटी जीवा

पेटविला क्रांतीचा वणवा
असा तुफानातील आग
माझ्या भीमाच्या समोर
झुकले तो महाभाग

असे नाव त्याच्ये गोड
जशी दुधावरची  साय
छाया देवूनी पंखांची
झाला कोटी जनाची तो माय

नेता असा वीर खंबीर
माझा भीमराव होता
सोनियाच्या तोलाचा
भीमा तुझा बोल होता

डोळे असुनी आंधळे आम्ही
भीमा तुझा आधार होता
लाखो जणांच्या मुखातील
भीमा तूच एक बोल होता

मी पहिले तुला दिनाचे
आसवे पुसताना
विझल्या निखार्यावरती
फुंकर हि घालताना

हीन दिनांच्या हक्का साठी
जीवाचे केले तू रान
कोटी दिन दलितांचा
झाला तू पंचप्राण      
झाला तू पंचप्राण   
झाला तू पंचप्राण   
झाला तू पंचप्राण   



मोहन कु-हाडे ...................

माझा प्रियकर.................!!!

माझा प्रियकर.................!!!


माझा प्रियकर  येईल तो

माझ्यावर खूप प्रेम करेल

तो आज येईल उद्या येईल

म्हणून मी वाटेवर उभी आहे

दिवसा मागे दिवस येऊन गेलीत

रात्री मागे रात्र जागून काढल्यात

वा-याने दार जरी वाजले

तरी वाटायचे

आला असेल माझा प्रियकर

मी धावत जायची दरवाज्या जवळ

दार उघडून बघायची ..................??

मग निराश मनाने शय्येवर येऊन बसायची

श्रावणातल्या धारा बरसल्या तेव्हा वाटायचे

कुठे असेल आता हा

स्त्याने चालत तर नसेल ना हा ?

त्याचे कपडे पावसाने चिंब तर झाले नसेल ना ?

इथे जर तो चिंब झाला असता

तर घट्ट मिठी मारून माझी उब


दिली असती मी त्याला

वैशाखेच्या उन्हां मध्ये  जर चालत असेल

तर माझ्या अंगावर झेलली असती

आणि सावली होऊन चालली असती मी

पण तो माझ्या पासून खूप  लांब आहे

मी त्याला सहकार्य कसे करू

देवा हा जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखी ठेव

माझी कमतरता भासवू नकोस त्याला ...........


मोहन कु-हाडे ........................!!!

एकदा तरी जाऊन बघ ...................!!!

एकदा तरी जाऊन बघ ...................!!!

उधाण येऊन गेलेल्या समुद्रावर................
आणि
विचार त्या विखुरलेल्या वाळूला
कि, मला भेटायला कुणी आले होते का, ?
सांगेल तुला ते सरे काही
पण...................
त्याला असे नको विचारू कि,
माझी प्रेयशी  आली होती का?
रागावेल तुझ्यावर ती
सांगेल तुला ती कि,
ती रोज यायची आणि लिहायची
इथेच तुझे नाव
पण, हा उधाणलेला समुद्र
रोज पुसून टाकायचा
तिने वाळूवर लिहिलेले तुझे नाव
अरे हा भालचंद्र  सुद्धा
साक्षीदार आहे रे
त्या रात्रीचा
जी रात्रच  जागून काढलीय
तिने तुझ्या आठवणीत
ये..........................
पण तू घाबरू नकोस
थोडे पुढे जा
आन विचार त्या खडकाला
सांगेल तुला तो सारे काही
अरे जाउदे सोड ना
मी कुठल्या दगडाला सांगतोय हे सर्व ....................!!!


मोहन कु-हाडे .................

बाकी काही नाही .............!!!

बाकी काही नाही .............!!!

आठवणींची आठवण काढते कुणीतरी
बाकी काही नाही ..................


बोलता बोलता शब्दही गारठून जातील माझे
बाकी काही नाही.........................


चालता चालता  काटाही रुतेल
कदाचित.....
लागेल हि एखाद्या दगडाची ठेच सुद्धा
रक्तही वाहेल त्या मधून
बाकी काही नाही .......................


चालत जरी असली मुल्घी रस्त्याने
तरी तच्या मध्ये मी तुलाच पाहिलं
अवती भोवती सारेच एक सारखे दिसतील
बाकी काही नाही ...........................


खणाणला जरी मोबाईल दुस-याचा
तरी माझाच मोबाईल चाच्पेल मी
वात बघेल एका फोन ची
बाकी काही नाही.......................... 




मोहन कु-हाडे .......................

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

गी-हाईक.................!!!

गी-हाईक.................!!!

मित्रानो, एक वेगळाच विषय आपल्या समोर आणलाय, बघूया किती मित्रांच्या पचनी पडते ते .,


असाच तो माझ्या कडे

अधून मधून यायचा ..........

म्हणून मी त्याला ओळखायची........

आणि, काल  तो माझ्या कडे

असाच येऊन गेला ...............

माझ्या सोबत काहीही बोलला  नाही

पण,

नुसता तो माझ्याकडे बघत होता .............

मी विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केला

पण त्याने टाळले ...............

तसे आमच्या दुनिये  मध्ये अनेक लोक येतात

उपभोगतात  आनि  निघून जातात ..........

पण का कुणास ठाऊक

ह्याचा चेहरा बघीतला म्हणजे  ................?

काल तसा तो माझ्या कडे  बराच वेळ बसला

आणि एक नोट हातावर ठेऊन निघून गेला ..............

कसा आला कसा गेला, ते मात्र त्याने कळू दिले नाही

आता तो बरेच दिवसा पासून माझ्याकडे आला नाही

पण, मी मात्र रस्त्यावर नजर टकून असते

एवढेच नाही तर तो माझ्या स्वप्नात सुद्धा आला

आणि मला काही तरी सुचवायचे आहे 

पण.............

पण, त्याची हिम्मतच झाली नाही

जरूर तो मला काही तरी गुपित सांगणार होता

खूप विचार किला

आणि स्वताशीच पुटपुटले

सेवटी  तो एक गी-हाईकच   होता ना ............................!!!


मोहन कु-हाडे.......................

तरच तुंचे नांव आहे.........!!!!

तरच तुंचे नांव आहे.........!!!!




एकदा येणे एकदा जाणे


हि तर जगाची रीत आहे


मरतेवेळी सोबत काहीच येत नाही


तरीही तिचेवर  प्रीत आहे



जन्मा पासून तर म्रीप्र्यंत


माणसाला हाव आहे


खोटी कामे करून करून


कितीही श्रीमंत झाला तरी


पळसाला पानांची संख्या  तीनच आहे



ठान्लेल्याना पाणी


भूकेलेल्याना अन्न ध्या


अथांग अश्या ह्या विश्वात


..


मोहन कु-हाडे .........................!!
=================

का म्हणून....................??

का म्हणून....................??


का म्हणून नाचायचे आम्ही

काळ्याकुट रात्रीतल्या नाचणा-या

चांदण्यांकडे बघून

का म्हणून चालायचे आम्हीच

रखरखत्या वैशाखेच्या उन्हामध्ये

तुमची सावली होऊन

काम्ह्णून पावसाचे टपोरे

थेंब झेलायचे

आमच्याच चेह-यावर

आमचे आसवे दिसायला नकोत म्हणून

का म्हणून आम्हीच चमकवायचे

शिशिरातल्या रात्रीला

का म्हणून आम्हीच आमचे

अश्रू प्याचे

का म्हणून....................??

का ..............................?????

मोहन कु-हाडे

मोग-याचा गझरा..........!!!

मोग-याचा   गझरा..........!!!

प्रेमा साठी  वाटेल ते

कर्नारांपैकी आम्ही नाही

चंद्र , सूर्य , तारे  तुझ्यासाठी

आणणारही नाही

मी म्हणणार हि नाही तुला

कि तुझ्या साठी काय करू

कारण खोटी आन घेणे

मला जमतच नाही

वाडा करणारांचे प्रेम

असते मतलबी

म्हणून फक्त प्रेम करतो तुझ्यावरी

वादा कधी करणार नाही

झालेच तर गुलाबाचे फुल आणेल

आणि आणेल एखादे वेळी

केसात माल्न्यासाठ.....................
मोग-याचा   गझरा..........!!!

मोहन कु-हाडे .....................

जाऊ दे सोड .................!!!

जाऊ दे सोड .................!!!

मी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न केला

कि मी स्वप्नात तर नाही ना ................?

मी बोलत नाहीये हे बघून ती

अधिकच चोखाळली......

ती म्हणाली भिकारड्या  पागला

तू खुशाल रागव

आदळ आपट कर

हवे  भुईवर गडबडा लोळ.....................

नाहीतर जन्मभर

माझा द्वेष करीत बैस....................

इथे कुणाला तुझ्या रागा लोभाची

पर्वा आहे !

बोलून चालून मी कोण आहे

पागलच ना ....................?

राग तर खूप आलाय

रागाने हातपाय थरकाऊ लागले

मी मुर्शा येऊन पडतो कि काय

असे वाटू लागले

वादळ घोंगावत असताना

मुसळधार पाउस कोसळत असताना

भयाण भविष्याची काळजी न करता

प्रेम केलेय तुझ्याशी

पण पण पण ..................

जाऊ दे सोड शेवटी पागलच ना ...................


मोहन कु-हाडे

हे प्रिये .............!!!

हे प्रिये .............!!!



हे प्रिये तू आता सावध रहा


तुला प्रन्यांकित  करण्यासाठी


मी येत आहे


तुला सुद्धा सहचारिणी


व्हावेसे वाटत असेल ना ?


तर मग सावध रहा


मी तुझ्यावर प्रणय धुंदी करेल


आणि त्या प्रणयाचे फळ


तुझ्या कुशीत दरवळेल


तू चौफेर एक समान दिसशील


तुझ्यात एक नव चैतन्य निर्माण होईल


तू फक्त नजर रोखून ठेव


बस तो क्षण समीप आहे 


मोहन कु-हाडे ........!!!

मी इथे असेल किंवा नसेल ...............!!!

मी इथे असेल किंवा नसेल ...............!!!

इथल्या बागेतील सर्व फुले उमलून


त्याचा सुगंध सगळीकडे दरवळलेला असेल


त्या फुलांचा सुगंध घेण्यास


मी इथे असेल किंवा नसेल


माझ्या स्त्कार्यामुळे


माझ्या नावाचा डंका


सगळी कडे वाजेल


सर्वांच्या मुखात माझ्या नावाचा


जयजयकार असेल


त्या जयजयकारच्या गगन भेदी


आवाज ऐकण्यास


मी असेल किवा नसेल


मंच सजलेला असेल जनता जमलेली असेल


विविध रंगी फुलांचे हार


मी असल्यास माझ्या गळ्यात घालतील


नसल्यास फोतोस घालतील


पण तो माझ्या स्त्कुर्त्याचा


सत्कार असल्या मुले


मी प्रत्याक्ष्यात जरी नसलो


तरी अदृश्या रुपी फोटोत असेल ..............


मोहन कु-हाडे 

अरे मित्रा थांब थोडे...............!!!

अरे मित्रा थांब थोडे...............!!!

अरे मित्रा थांब थोडे

एवढ्या अधीर मनाने

चाललास कोठे,

रस्ता चुकशील,

संकटी सापडशील,

कारण हे जग आहे खोटे................

तुझ्या सारखे सोबती

तुला भेटेल का या अफाट जगात

संकुचित मनाचे आहे रे हे जग

तुला येथे सर्वच लोक खोटे मानतील

तिरस्कार हि करतील म्हणून

घाबर अपमानाला येथे,,,,,,,,,

धिक्कार करतील, तुला सारे रडवतिल सुद्धा

आणि खोटेच समजाव आपल्या मनाला

कारण हे जग फार खोटे  आहे रे.....................


मोहन  कु-हाडे ..................

खेळलीस तू कशाला ................!!!

खेळलीस  तू कशाला ................!!!


पहायचेच होते नुसते तुला तर
हसलीस तू कशाला
मनांच्या भावनांशी माझ्या
खेळलीस  तू कशाला......................


घेऊ नकोस खोटी
आन ह्या प्रीतीची
पहिले प्रेमाचे घरटे
मोडलेस  तू कशाला ........................


केले तूच जखमी
नाजूक मन हे माझे
चोळून मीठ पहिले
लाळ घोळतेस तू कशाला .............................


होते प्रीतीचे पहिले
आता झाले विरह गाणे
विरहाच्या गीतास माझ्या
सूर लावतेस तू कशाला....................

मोहन कु-हाडे  ..................

प्रेम .................!!!

प्रेम .................!!!



हृदयाच्या कप्यातून निघालेले

ते माझे पवित्र प्रेम होत

झा-याच्या निर्मळ झुळझुळ

वाहणा-या पाण्यासारखे

ते माझे प्रेम होत

मायेच्या ओलाव्याने

काठोकाठ भरलेले

ते माझे प्रेम होत

शिशिरातल्या काल्याकुठ

रात्रीला


काजव्यांच्या उजेडाने लक्ख

होऊन चांदणे झिर्पावे


ते माझे प्रेम होत


वैशाखेच्या उन्हात साउली


होऊन सोबत चालणारे


ते माझे प्रेम होत

कृष्णाच्या सखीन्सारखे जरी

नसले तरी

ते एका नाजूक धाग्यात

बांधलेलं

ते माझे प्रेम होत  ......................


मोहन कु-हाडे   .............

आठवण तुझीच येते .................!!!!

आठवण तुझीच येते .................!!!!

आठवण तुझीच येते
दिवसाच्या हर  घडीला
तू समीप नाही माझ्या
हीच खंत आहे मनाला


नयन माझे आतुर झाले
मुख कमल तुझे पाहण्याला
हे माझ्या प्रिय फुलपाखरा
माझा निरोप दे प्रियेला


जर का झाली नाहीस माझी
त्यचीच खंत राहील मला
फुलपाखराच्या पंखावरुनी
भेटायला येईल मी तुला


मोहन कु-हाडे ..................

माझ्या उद्याच्या जिन्याची .................!!!

माझ्या उद्याच्या जिन्याची .................!!!


माझ्या उद्याच्या जिन्याची

आशा हि तूच होती

माझ्या हर गीताची

भाषा हि तूच होती


सांगून गंध गेला

तुझे बरेच काही

माझ्या मनाच्या बागेतील सुद्धा

तूच गुलाब होती


आणि लिहायचे नाही

तव प्रती मला काही

माझ्या स्वप्नाच्या दुनियेतील

अप्सरा हि तूच होती ................


मोहन कु-हाडे ...........!!!
==================

मालवून टाक दिवा सखे ....................!!!

मालवून टाक दिवा सखे


रात्र खूप झाली आता


चांदण्यांच्या प्रकाशाने


झोपडी लक्ख झाली आता


घेतले कुशीत आकाशाने


चंद्र तारकांना


घे मिठीत मला तू सखे


रात संपून जाईल केव्हा


रेशीम गाठ बांधली जेव्हा


स्वप्नही खूप बघितले आहे


घे मिठीत सजनी मला आता


रात्र लख चांदण्यांची आहे .................

मोहन कु-हाडे

===============

दोघेही मुकेच होतो ...............!!!

तुही तशीच होती

मीही तसाच होतो

भेटीच्या पहिल्या वेळी

दोघेही मुकेच होतो ...............



प्रीतीच्या हर खुणेला

तू साद देत होती

सत्य क्ठ्न्या तुला मी

मनात भीत होतो ...................



माझ्या नयनांच्या शरांनी

तू घायाळ होत होती

सावज तूच होती

शिकारी मीच होतो................



मोहन कु-हाडे

ओल्या चिंब पावसात ..............!!!

ओल्या चिंब पावसात ..............!!!

ओल्या चिंब पावसात
झाली रे मी ओलीचिंब
आला मृगाचा पहिला पाऊस
बहरूनी वेली झाल्या धुंद


येत होता वास मातीचा
पडे थेंबावर थेंब पाउस
थाकलीरे वेड्या वाट पाहून मी
पाण्यात बघण्याची मोठी हौस


मारली आहे पावसाने मिठी मला
आकाश्याला साक्षी ठेऊन
प्रणय आलिंगन मारले मी
पावसाला साक्षी ठेऊन.................

मोहन कु-हाडे 

सवळ मिळाली तेव्हा ................!!!

सवळ मिळाली तेव्हा ................!!!


तशी माणसांची भीती


आम्हा मुळीच वाटत नाही


कारण प्रत्येक प्रकारची माणसे


आमच्या कडे येतात ...........


माणसे येतात उपभोगतात


आणि निघून जातात


मात्र काही जणांचा स्वभाव


हसण्या सारखा असतो


तो अश्या बद्दल कि,


तो म्हणतो कि , तू मला खूप आवडतेस


अशा बद्दल खूप हसू येतय,


 आणि


त्याच अगदी हृदयाच्या तळापासून बोलण


त्यामुळे मन त्याच्यावर प्रेम सुद्धा करायला लागत


पण तो एवढ्यावरच थांबत नाही तर


म्हणतो कि, माझेशी लग्न करशील का?


हे ऐकल्यावर वाटते कि लग्न करावे


चांगला संसार थाटावा पण..............


लगेच मन बोलत कि,


नाही हे तुला आता शक्य नाही


कारण......................


समाज आता तुला स्वीकारणार नाही


जरी त्याने तुला पत्नी म्हणून स्वीकारले तरी


शेवटी समाजाच्या प्रश्नाचे  उत्तर द्यावीच लागणार ..........


नाही, मला आता हे शक्य नाही


एवढे मात्र जरूर कि,


मी तुमची


आतुरतेने वात बघेल


अशेच येत चला इकडे कघी कधी


सवळ मिळाली तेव्हा .......................!!!!!


मोहन कु-हाडे.................


तूच होती..............!!!

तूच होती..............!!!

माझ्या उद्याच्या जिन्याची

आशाही तूच होती

माझ्या हर गीताची

भाषा हि तूच होती


सांगून गंध गेला

तुझे बरेच काही

माझ्या मनाच्या बागेतील सुद्धा

तूच तर गुलाब होती


आणि लिहायचे नाही

तव प्रती मला काही

माझ्या स्वप्नातल्या बागेतील

अप्सरा हि तूच होती..............


मोहन कु-हाडे.................

स्तुती .............!!!

स्तुती .............!!!
स्तुती करण्यास तुझी ग
शब्दही पडती अपुरे माझे
सौंदर्याची मूर्ती आहेस तू
नाही काही दुसरे तिसरे


प्रेमात पडलो मी तुझ्या
मज वाटे तेव्हा बोलावे पुरे
नंतर सजणे तुलाच पाहता
भूक तहान माझी विसरे


स्वप्नात सुद्धा तूच दिसायची 
न दिसे दुसरे काही
जेव्हा बघतो सोले उघडूनी
तेव्हा खाटेवर काही नाही


पुन्हा झोपता तूच दिसायची
आणि तू फारच हसायची
हसता हसता  तूच म्हणायची
स्वप्न आही हे नव्हे खरे ....................!!!


मोहन कु-हाडे

जन्मलो मी जेव्हा ............!!!

जन्मलो मी जेव्हा ............!!!


जन्मलो मी जेव्हा
दुखच घेऊन आलो
फक्त सुखच दे मला
असे मी कधी म्हणालो


जन्मच हा भारलेला
दुखाने मानवाचा
त्याच्या विरुद्ध फिर्याद
घेऊन मी केव्हा  आलो


करिती माझी थट्टा
माझीच माणसे सारी
होवो त्यांचे बुरे
असे मी कधी म्हणालो


सारतात दूर मला
माझेच भाऊबंध
तू दे त्याना शिक्षा
असे मी कधी म्हणालो 


मोहन कु-हाडे .............

माहा बळीराज ..................!!!

माहा बळीराज ..................!!!

वावरत काम करे
थकलेला बाप
म्हणून त्याले म्हणतात
माहा बळीराज
हो सारे बळीराज

स्वता राहून उपवाशी
घास  घाली  जगाला 
राहून स्वता अनवाणी
बूट घाली सायेबाला 
दरबारी सायेबाच्या
काहीच नाही मान
म्हणून त्याले म्हणतात
सारे बळीराज

उन्हां मध्ये लाही लाही
करते त्याचा जीव
पावसात घेऊन घोंगड
फिरतो रानो रान
पर्वा नाही कशाचीही
तरी करते  काम
म्हणून त्याले म्हणतात
माहा बळीराज

बांधावर उभा जसा
माहा विठूराय
नागमोडी चालत येई
जशी रुख्माय
झाडा खाली तुरीच्या त्या
खातात भाकर
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज

पोया मदे बैल सजवे
असा माया बाप
घाट लावी मस्तकाले
खांद्याले त्या तूप
पाठीवरी  झूल टाके
कपाळी बाशिंग
असा आहे गुणवान महा बळीराज
म्हणून त्याले म्हणतात
महा बळीराज
("हंबरून वासराले चाटते जशी गाय" . ह्या गीताच्या चालीवर मी
हा एक छोटासा प्रायत्न केला आहे मला आशा आहे कि आपणाला नक्की हि कविता आवडेल )

मोहन कु-हाडे  ...................!!!

फेसबुक ची गोस्ट...............!!!


फेसबुक ची गोस्ट...............!!!

काय सांगू  राजा ह्या
फेसबुक ची गोस्ट
हौसे, गौसे, नौसे इथे
सारेच दिसतात मस्त


कवी लेखक विचारवंतांची
तर येथे कमीच नाई
कंपुगिरी वाल्यांची
तर रीतच हाय  न्यारी


गृपवाल्यांची संख्या  तर
लाखोच्या घरात
नाव सुद्धा राज्या त्यांचे
लयच हायत खास


फेक वाल्यांची तर
अति  कमीच नाई
ख-या लोकाएचे अति
काईच खर नाई


लहाना पासून तर मोठ्यांपर्यंत
सारेच दिसतात अति
कमतरता नाही कोणाचीच
नमुने लई भारी


इथे काही फेस घेऊ
फेसबुक वर वावरतात
चेहरा नाही स्वताचा
नावेही फेकच असतात


काय सांगू राजा या
फेसबुक ची गोस्ट
शेजारच शेम्बड पोट्ट
तेही दिसते मस्त


कमेंट नाही देता येत
म्हणून लाईकच  करते
दिसली जर एखादी पोट्टी  ओन्लाईन
तर हे बेन गालातच हासते


समजत नाही काईच याले
मले बोर लई करते
रिक्वेस्ट  कशी पाठवू म्हणते
शेजारच्या बलीले


फेसबुकवरची गर्दी
जत्रे सारखी झाली
हवसे गवसे नवसे सतरा
सारेच हायेत भारी


मोहन कु-हाडे   ..................

ओठ का अबोल झाले .................

आज ह्या मैफिलीत माझ्या ................!!!


आज ह्या मैफिलीत माझ्या
कमी हि फक्त तुझीच आहे
तव साठी विना हे गीत माझे
किना-या विनाची नाव आहे


जाणून घे मला तू
समजू नकोस काही
सांगू कसे तुला मी
देऊ कशाची ग्वाही


पाहून सर्वास येथे
मन माझे भरून गेले
मुखात गीत घेउणु
ओठ का अबोल झाले   
ओठ का अबोल झाले   
ओठ का अबोल झाले .................

 

मोहन कु-हाडे ...............

हि मिठी रेशमाची ...................!!!

हि मिठी रेशमाची ...................!!!


ना विझला अजुनी चंद्र
ना विझला अजुनी तारा
सखे येणा मिठीत माझ्या
छेडू मिलनाच्या तारा


न कळले कधी मला
कि , रात्र संपली केव्हा
चुंबिले तू भाळ माझे
मज जाग आली तेव्हा


कर मोकळी गळ्यातील
हि मिठी रेशमाची
चल उठ सखे आता
रात्र संपली चांदण्यांची



मोहन कु -हाडे..................

तेव्हा एक कविता लिहिली ...............!!!!

तेव्हा एक कविता लिहिली .................
तू एक नाजूक काळी होती
तेव्हा एक कविता लिहिली .................

त्या कळीचे जेव्हा फुल झाले
तेव्हा एक कविता लिहिली .....................

श्रावणातल्या  सरींचे टपोरे थेंब
जेव्हा तुझ्या गालावरून ओघळत होते
तेव्हा एक कविता लिहिली .........................

चांदण्या रात्रीत जेव्हा तू
शीतल शांत चंद्रा कडे बघून हसायची
तेव्हा एक कविता लिहिली .................

तुझ्या सौंदर्याची स्तुती करायचो
तेव्हा एक कविता लिहिली ..........................

शीत प्रहरी जेव्हा स्वेटर घालून तू आली
तेव्हा एक कविता लिहिली .......................

अन ............................

जेव्हा तू मला दु:खाच्या सागरात
एकट्याला सोडून गेलीस
तेव्हा माझे शब्दही घेवून गेलीस
तेव्हा मात्र मला कविता आलीच नाही ...................

मोहन कु-हाडे....................
१२/१०/२०११