बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

मन खूप भरून आलय आज.................!!!



मन खूप भरून आलय आज.................!!!

आपलं  कुणितरी  असलं

तर खांद्यावर डोकं  ठेऊन रडता तरी येत

नेमकं  काय होतय  आज कळतच नाही

उदास झालाय  आज जीवन

लक्ख चांद्ण्यात  सुद्धा

शिशीरातला काळोख दाटलय आज.............

मन एका जागेवर स्थिरावतच  नाही

रंगीबेरंगी फुलपाखरासारखे 

ह्या फुलावरून त्या फुलावर धाव घेताय

ह्या मनातील भावना कुणातरी जवळ

मोकळ्या कराव्या  वाटतात

पण जवळचे आहे तरी कोण...........

सेवटी  हाताची उशी करून

हमसून हमसून रडतोय आता............

मन तर खूप हळवे आहे

काय करावे कसे समजवावे

कळताच नाही

त्याला सुधा कळले असेल

कि,

ह्या जगात हक्काचे कुणीच नाही  .......................!!!



मोहन कु-हाडे ...........................!

गुज गोष्ठी................

ट्रिन........... ट्रिन ............ट्रिन .............ट्रिन .............ट्रिन.............ट्रिन............."हेलो, कधी येणार आहात घरी,"............ "हा हा लवकरच येतो, जेवण बनविले का?." .............."हो बनविले"............. " माझा मित्र जेवायला येणार आहे. एखाद्या माणसाचे शिल्लक बनविले ना?"........... " कोण येणार आहे"............. "अग श्री येणार आहे. त्यांच्या घरी कोणी नाही, ते मला बोलले कि आपण बाहेर जावून सेलिब्रेशन करू, पण मीच त्यांना नाही बोललो. अनि म्हणालो कि हे सेलिब्रेशन माझ्याच घरी करू".............." ठीक आहे, या मी बनविते काहीतरी".............
यांच्या मित्राला मुलगी झाली म्हणून हे त्यांना भेटायला दवाखान्यात गेले. आणि मला फोन केला कि, माझा मित्र जेवायला येणार म्हणून. मी गोंधळूनच गेले, काय करावे सुचतच नव्हते. मी आमच्या साठीचा स्वयंपाक करून घेतला होता. पोळ्या, तुरीची दाळ,  भात. पण आता यांचे मित्र येणार म्हणजे काहीतरी अजून थोडे फार करावे लागेलच. काश्याची वेगळी भाजी करावी तर घरात काही हिरवा भाजीपाला पण नव्हता. मग अश्या वेळेला मी पापडाची चटणी, लोणचे, आणि घरात साखर आंबा होता त्यावरच भागविले. आणि वांग्यांची भाजी बनविली. हे दोघेही आले आणि यांना जेवण दिले. जेवणामध्ये दाळ, भात, चपाती, पापडाची चटणी, लोणचे, साखर आंबा.  दोघेही पोटभर जेवले. ज्यांचे मित्र श्री म्हणायचे जेवण होईपर्यंत "वाहिनी स्वयंपाक छान झाला. आणि जेवण पण खूप झाले..........................."
खरे सांगायचे तर त्यांच्या पेक्ष्या मलाच ज्यास्त आनंद झाला. श्री पोटभर जेवल्या मुळे ............. गुज गोष्ठी 

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

आई..................!!!


आई..................!!!

लिहिले ब-याच जनांनी
लिहितील बरेच काही
शब्द साच्यात बंद होई
महती तुझि ग आई..............



केले तु हट्ट पूर्ण
असता मि बाळ तान्हा
पाजुनी मोठे केले
तुझा तु अमृत पान्हा...............




आई तुझ्या प्रितीचे
जगात ह्या मोल नाही
तव अंगाई गिताने
मज शांत झोप येई....................



आई म्हणु मि कोणा
न साद कूणी देई
हंबरुणी वासराचा
कोरडा हा कंठ होई.....................


आई म्हणु तुला ग
शकुला हा तुझा पुकारी
जरी स्वामि तिन्ही जगाचा
तव विना मि भिकारी  ..................


मोहन कु-हाडे .........................

जेव्हा माझ्या पायात काटा रुततो " ...........!!!

"जेव्हा माझ्या पायात काटा रुततो " ...........!!!


पावसाच्या सरी कोसळतात


तवा काम करतो मी वावरात


माजे दोस्त मात्र


घरी गरमा गरम भज्यांचा स्वाद घेत


घोटावर घोट रिचवतात चहाचा पोटात


आणि कविता करतात


"जेव्हा माझ्या पायात काटा रुततो "


आतून आवाज येतोय


"बेटा भजी कसे झालीत "


"मम्मी थोडे  कुरकुरीत पाहिजे होती "


अरे येऊन बग माया कायां वावरात


पायाले चिखल कसा झोंबते


बंगाली बाभळीचा काटा


टोचून बग पायाले


लाल रगत कस वायते


तवाच कळेल कि,


"जेव्हा माझ्या पायात काटा रुतते "


मिर्गाचा पयला पाउस पडते


तवा मातीचा वास घेतला कधी


जवा प्रीयेशिला भेटायला जातोस


तवा अत्तर लावायला इसरत नाही कदी.................




मोहन कु-हाडे...........!!!

नखरा नवीन आहे ..........!!!

नखरा नवीन आहे ..........!!!


आरसा जरी नवा पण

चेहराही  तोच आहे

चेह-या वरी खुणा त्या

बघण्या डोळाही तोच आहे


कंठात गीत तुझ्या

हृदयात मीच आहे

रंग भ-या गीताला

तू साद देत आहे


डोळ्यात बघ तू माझ्या

हे रुपडे तुझे पण ?

नखरा नवीन आहे

चेहराही तोच आहे .................!!!


मोहन कु-हाडे

फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!

फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!


नयन माझे आतुर आहेत
फक्त तुला पाहण्या साठी


ओठ माझे आतुर आहेत
तुझ सवे बोलण्या साठी


काव्य मी हे लिहित आहे
फक्त तुला वाचण्या साठी


गीत मी हे गात आहे
फक्त तुला ऐकविण्या साठी




जीवन मी हे जगत आहे
फक्त तुझ्याच मैत्री साठी .....!!


मोहन कु-हाडे .............

मि राग अन तू रागिणी ..................!!!

मि राग अन तू रागिणी ..................!!!



जे एकले होते मी

त्याही पेक्षा तू देखणी

गाऊ आपण प्रेमाच्या गळ्याने

मि राग अन तू रागिणी


होऊनी फिदा तुझ्या स्वभावी

मनी वाटे अर्धांगिनी अशी असावी

जी मिळविल चौघात मान

लक्ष्मीच्या रूपाने तू पत्नी दिसावी


पूर्ण न झाली मनाची माझ्या आशा

ना लागला डोळ्यास डोळा

उघड्या डोळ्यांनी मी पाहिले स्वप्न

चढली होती मदनाची नशा .....................!!!



मोहन कु-हाडे  .................!!!